Monthly Horoscope May 2024 : साधारण २८ ते ३० दिवसांच्या अंतराने ग्रहांची हालचाल होत असते, परिणामी प्रत्येक महिन्यात काही महत्त्वाचे ग्रह गोचर होत असतात. मे महिन्यात सुद्धा चार मोठ्या ग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होणार आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ मेला दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी गुरु ग्रहाचे वृषभ राशीत गोचर होणार आहे. तर १० मे रोजी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी बुध ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. ग्रहांचे राजे सूर्यदेव महिन्याच्या मध्यात म्हणजेच १४ मे ला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर पाच दिवसांनी १९ मे ला सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी शुक्र ग्रह वृषभ राशीत येणार आहे. या महिन्यात वृषभ राशीत ग्रहांचा मेळावा असणार आहे असंही म्हणता येईल. त्याचा प्रभाव मेष ते मीन राशीवर कसा होईल हे आपण ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१ ते ३१ मे पर्यंतचे १२ राशींचे भविष्य

मेष रास (Aries May Month Rashi Bhavishya)

१ मे ला गुरू द्वितीय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करत आहे. १४ मे ला रवी आणि १९ मे ला शुक्र देखील वृषभेत प्रवेश करेल. कौटुंबिक प्रश्न सुटतील. समस्यांची उकल सापडेल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. वकिली डावपेच १० मे च्या आत यशस्वी ठरतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेली मेहनत फळास येईल. उच्च शिक्षणासाठी असलेल्या स्पर्धा परीक्षांची तयारी कसून करावी लागेल. हयगय चालणार नाही. नोकरी व्यवसायात आर्थिक उन्नती होईल. बढतीचे योग आहेत. इतरांशी संभाषण आणि नातेसंबंध चांगले ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. वधूवरांचे विवाह जुळतील. ओळखीतून बोलणी होण्याची शक्यता!

वृषभ रास (Taurus May Month Rashi Bhavishya)

१ मेला गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल. हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. कष्टाचे चीज होईल. दशम स्थानातील शनीचा उत्तम पाठिंबा मिळेल. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला काल आहे. याचा पुढे नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला गोंधळात पाडणारी स्थिती निर्माण होईल. अशावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक योग्य वाट दाखवतील, मेहनत आणि कष्टात कसलीही कसूर करू नका. नोकरी व्यवसायात आत्तापर्यंत धीर धरल्याने अनेक लाभ होतील. आर्थिक स्तर उंचावेल. विवाहोत्सुक मंडळींनी वधूवर संशोधन सुरू करावे.विवाहित दाम्पत्यांमधील वाद, तंटा मिटेल. समजूतदारपणा कामी येईल. गुंतवणूक करताना मर्यादित जोखीम पत्करण्यास हरकत नाही.

मिथुन रास (Gemini May Month Rashi Bhavishya)

१ मेला गुरू मेष राशीतून व्ययस्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल, आपले गुरुबल कमजोर होईल. लाभ स्थानातील उच्चीचा रवी आपले धैर्य खचू देणार नाही. जिद्दीने पुढे जाण्यातच खरी हिंमत आहे. विद्यार्थी वर्गाला सचोटीने परीक्षेची तयारी करायला लागेल. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणातील परीक्षा यात आपला खरा कस लागणार आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगली बाजी माराल. विवाहोत्सुक मंडळींनी आता थोडे सबुरीने घ्यावे. विवाहित दाम्पत्यांनी आपल्यातील गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करावेत. १९ मेला शुक्र वृषभेत प्रवेश करेल. याचा गुंतवणूकदारांना लाभ होईल. उन्हाळी सर्दीने बेजार व्हाल. साथीच्या आजारांपासून सावधान!

कर्क रास (Cancer May Month Rashi Bhavishya)

महिन्याच्या सुरुवातीलाच १ मेला गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुचे हे भ्रमण आपणास लाभकारक असेल. १४ मे पर्यंत दशम स्थानातील रवी उच्च राशीत विराजमान असल्याने कामकाजाला गती मिळेल. विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करावी. नक्कीच यशस्वी व्हाल. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी चांगला कालावधी सुरु झाला आहे. विवाहित दाम्पत्यांना संततिप्राप्तीचे योग आहेत. वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन हिताचे ठरेल. घर, जमीन, मालमत्ता यांचे प्रश्न ऐरणीवर येतील. कायदेशीरमार्गाने पुढे जावे. गुंतवणूकदारांना चांगला धनलाभ होईल. दीर्घ मुदतीची गुंतवणूक विशेष लाभकारक ठरेल. उष्णता आणि कफाचे विकार बळावतील.

सिंह रास (Leo May Month Rashi Bhavishya)

महिन्याच्या सुरुवातीलाच १ मेला गुरू दशम स्थानातील वृषभेत प्रवेश करेल. भाग्य स्थानातील उच्चीचा रवी आपल्या कामाचा दर्जा उंचावण्यास मदत करेल. मानसन्मान, प्रतिष्ठा मिळाल्याने आत्मविश्वास दुणावेल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाला ग्रहांचा पाठिंबा मिळेल. यशाच्या दिशेने वाटचाल कराल. नोकरी व्यवसायातील खाचखळगे ओळखून धोरणी वृत्तीने वागाल. स्वतःबरोबर इतरांचे देखील हित साधाल. आपल्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. घरासंबंधीत प्रश्न रेंगाळतील. निर्णय घेता येणार नाही. गुंतवणुकीच्या परताव्याची शाश्वती नाही. त्यामुळे नियंत्रित जोखीम पत्करलीत तरी सावधगिरीचा इशाराच मिळेल. मूत्रपिंडाच्या विकारांचे लवकर निदान होणार नाही.

कन्या रास (Virgo May Month Rashi Bhavishya)

१ मेला गुरू भाग्य स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. अनेक गोष्टी सुरळीत पुढे जाण्यास मदत होईल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी हा गुरू अत्यंत अनुकूल असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे नक्कीच चीज होईल. नोकरी व्यवसायात आपले पारडे जड होईल. कोर्ट कचेरीच्या कामांना गती मिळेल. आवश्यक कागदपत्रांची जुळवणी करून ठेवावी. विवाहोत्सुक मंडळींनी आपल्या जोडीदाराचे संशोधन सुरू करावे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन शाश्वत योजनांमध्ये पैसे गुंतवावे. आरोग्यदृष्ट्या हा महिना चांगला जाईल अतिरिक्त उष्णतेचा त्रास होऊ नये याची सुरुवाती पासूनच खबरदारी घ्यावी.

तूळ रास (Libra May Month Rashi Bhavishya)

१ मे रोजी गुरू अष्टम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. सुरळीत चालू असलेली कामेविनाकारण रखडतील, रेंगाळतील. विद्यार्थी वर्गाला शनीचे सहाय्य मिळेल. भरपूर मेहनत घेतल्यास शनी चांगलेफळ नक्की देईल. अभ्यासावरची पकड ढिली होऊ देऊ नका. नोकरी व्यवसायात गाडी धीम्या गतीने चालतराहील. मुद्दाम एखाद्याच्या विरोधात जाऊ नका. विषयाची संपूर्ण माहिती आधी मिळवा. मगच आपले मतमांडावे. विवाहोत्सुक मंडळींना गुरुबल कमजोर असल्याने थोडे धीराने घ्यावे लागेल. विवाहितांनी एकमेकांच्याभावनांचा आदर करावा. गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा मिळेल. सावध राहा. त्वचेचे विकार बळावतील.

वृश्चिक रास (Scorpio May Month Rashi Bhavishya)

वर्षातील महत्वाचा ग्रह बदल या महिन्यात होणार आहे. १ मेला गुरू सप्तमतील वृषभ राशीत प्रवेश करेल. चांगले गुरुबल प्राप्त होईल. विवाहोत्सुक मंडळींना वधूवर संशोधन सुरू करण्यास चांगले ग्रहबल मिळेल. विवाहित दाम्पत्यांनी कौटुंबिक जबाबदारी नेटाने आणि स्वखुशीने सांभाळावी. विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षांची जय्यत तयारी सुरू करावी. निश्चित यश मिळेल. नोकरी व्यवसायात विरोधक आणि हितशत्रूंना योग्य धडे द्याल. पण ध्यानात असू द्यावे, अतिरिक्त आत्मविश्वास कामी येणार नाही. घर, प्रॉपर्टीच्या कामात गती येईल. त्या अनुषंगाने बऱ्याच नव्या गोष्टी समजतील. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या अनुभवातून कुठे थांबायचे हे देखील शिकाल.

धनु रास (Sagittarius May Month Rashi Bhavishya)

१ मे रोजी महत्वाचा राशी बदल होणार आहे. गुरू षष्ठ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. एकंदरीत गुरुबल थोडे कमजोर होईल. पण अनेक बाबींसाठी खूप साहाय्यकारी असेल. विद्यार्थी वर्गाला गुरुचे पाठबळ थोडे कमी झाल्याने अधिक मेहनत घ्यावी लागेल, पळवाट शोधून उपयोग नाही. नोकरी व्यवसायात हितशत्रूंना पुरेपूर शह द्याल. वरिष्ठ अधिकारी आपल्याला पाठिंबा देतील. विवाहोत्सुक मंडळींना हा गुरुबदल थोडे थांबण्याची सूचना देईल. त्यामुळे धीर धरणेच इष्ट ठरेल. विवाहितांच्या बाबतीत मनात गैरसमज निर्माण झाल्यास तो दूर करणे फार कठीण जाईल. गुंतवणूकदारांच्या पैशाचा योग्य परतावा मिळेल. उष्माघात, घशाला इन्फेक्शन होणे, डोकेदुखी असे त्रास सहन करावे लागतील.

मकर रास (Capricorn May Month Rashi Bhavishya)

१ मे रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू असला तरी या गुरुबलामुळे आपणास मोठा आधार मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाने उच्च शिक्षणाच्या अभ्यासावर, परीक्षांवर विशेष लक्षकेंद्रित करावे. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. विवाहोत्सुक मंडळींनी वधूवर संशोधनास सुरुवात करावी. विवाहितांच्या नातेसंबंधात प्रेम, जिव्हाळा वाढेल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने गुरूचा राशी प्रवेश हिताचा ठरेल. छंदातून आर्थिक उत्पन्न मिळवाल. तंत्रज्ञान, कला, साहित्य यात प्रगती कराल. गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळाल्याने नव्या आर्थिक वर्षात उत्साह वाढेल. गुडघा, सांधे यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

कुंभ रास (Aquarius May Month Rashi Bhavishya)

१ मे रोजी गुरू चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होणार आहे. अडीअडचणी, दिरंगाई असे परिणाम अनुभवास येतील. साडेसातीचा प्रभाव देखील असेलच. यातूनच मार्ग काढत पुढे जायचे आहे. विद्यार्थी वर्गासाठी नवी आव्हाने पुढे उभी राहतील. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणातील प्रवेश परीक्षा यांचा अभ्यास करताना एकाग्रता, मेहनत आणि व्यवहार ज्ञान यांची गरज पडेल. नोकरी व्यवसायात व्यवस्थापनाची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडाल. कामाचा ताण जाणवेल. अशावेळी जवळचा मित्र, मैत्रीण, पालक वा जोडीदारासह आपल्या भावना व्यक्त केल्यास हलके वाटेल. विवाहित मंडळींना जोडीदाराची साथ महत्वपूर्ण ठरेल. घराच्या बाबतीत वाद वाढतील. मोठी जोखीम टाळा.

हे ही वाचा<< शनीचं बळ व गुरुची बुद्धी, ९ दिवसांनी ‘या’ तीन राशींना अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी; ‘असं’ असेल माता लक्ष्मीचं रूप

मीन रास (Pisces May Month Rashi Bhavishya)

१ मे रोजी गुरू तृतीयेतील वृषभ राशीत प्रवेश करेल, आपणास मध्यम गुरुबल असेल. कामातील अडचणी भरपूर मेहनत घेऊन दूर करव्या लागतील. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी परदेशगमन योग येईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा यांचा गंभीरपणे विचार केलात तरच आपला टिकाव लागेल. नोकरी व्यवसायात हितशत्रूंच्या त्रासाला कंटाळून जाल. पण थोडे धीराने घ्यावे. कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान आपल्याला परवडणारे नाही. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन कार्य सुरू ठेवावे. ओळखीतून स्थळ मिळेल. विवाहितांना कौटुंबिक समस्या उदभवतील. नाजूक प्रश्न हळूवारपणेच हाताळले पाहिजेत. घराच्या बाबतीत योग्य निर्णय घ्याल. ताण तणावामुळे पित्त विकार वाढेल.