Ajche Rashi Bhavishya : २ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी रविवारी रात्री ९ वाजून ०३ मिनिटांपर्यंत राहील. दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत शुभ योग राहील, त्यानंतर शुक्ल योग जुळून येईल. तसेच उत्तरा भाद्रपद नक्षत्र सकाळी ९ वाजेपर्यंत राहील, त्यानंतर रेवती नक्षत्र जागृत असेल. तसेच राहू काळ संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

याशिवाय सकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी शुक्र मीन राशीत वक्री होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर किंवा वक्री स्थितीत येऊन राशी व नक्षत्र बदल करत असतात. प्रेम, संपत्ती व वैभवाचे कारक शुक्र ग्रह अलीकडेच मीन राशीत प्रवेश घेतील. तर शुक्रदेव कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी देणार हे आपण जाणून घेऊया…

२ मार्च पंचांग व राशिभविष्य :

मेष:- कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. विषय वासना वाढू शकते. हौसेचे मोल लक्षात घ्याल.

वृषभ:- दिवस घाईगडबडीत जाईल. खिलाडु वृत्तीने वागाल. मित्रांशी पैज लावाल. बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील. उपासनेसाठी वेळ काढावा.

मिथुन:- कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बागबगीच्याच्या कामात गुंग व्हाल. समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल. घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

कर्क:- बौद्धिक छंद जोपासाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल. साहित्य प्रेम दर्शवाल. भावंडांच्या सहवासात जुन्या आठवणीत रमाल.

सिंह:- आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत. कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो. सामाजिक संबंध जपावेत.

कन्या:- आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल. स्वत:चे म्हणणे खरे कराल. इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत. काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील.

तूळ:- मानसिक चंचलता जाणवेल. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी. आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी.

वृश्चिक:- व्यावसायिक लाभ सुनिश्चित करावा. मित्रांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांना खुश करता येईल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

धनू:- कामाची वेळेनुसार छानणी करावी लागेल. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. राग आवरता घ्यावा लागेल. कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. प्रवासात काळजी घ्यावी.

मकर:- धार्मिक स्थळांना भेट द्याल. तात्विक विचार मांडाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल. थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. क्षमाशीलतेने वागाल.

कुंभ:- दिवसभर कामाचा ताण राहील. बौद्धिक ताण जाणवेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. इतरांच्या मताचा विचार करावा. योग्य संधीची वाट पहावी.

मीन:- बदलीची चिन्हे दिसतील. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. कामात उर्जितावस्था येईल. वैचारिक सुसूत्रता ठेवावी. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 march 2025 rashi bhavishya how will the day of 12 zodiac signs turn around with the grace of venus read aries to pisces horoscope in marathi asp