Daily Horoscope 20 December 2024 :  २० डिसेंबरला आज मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील उदया तिथी पंचमी आणि शुक्रवार आहे. पंचमी तिथी शुक्रवारी सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. २०डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत विश्वकुंभ योग राहील. तर मघा नक्षत्र शुक्रवारी रात्री ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत जागृत राहील. दरम्यान विश्वकुंभ योगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल तर कोणत्या तोटा जाणून घेऊ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२० डिसेंबर २०२४ चे राशीभविष्य आणि पंचांग ( Today Horoscope 20 December 2024 In Marathi)

मेष:-स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.

वृषभ:-संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.

मिथुन:-नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.

कर्क:-घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.

सिंह:-नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.

कन्या:-आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.

तूळ:-कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

वृश्चिक:-मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू:-कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.

मकर:-अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कुंभ:-तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मीन:-जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 december 2024 rashi bhavishya panchang in marathi daily horoscope magha nakshatra vishva kumbh yog mesh to meen zodiac sign who will earn more money happies today astrology sjr