Daily Horoscope 20 january in Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २० जानेवारी रोजी पौष कृष्ण पक्षातील उदया तिथी षष्ठी आणि सोमवार आहे. षष्ठी तिथी सोमवारी सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर सप्तमी तिथी सुरू होईल. २० जानेवारीला दुपारी 2 वाजून ५२ मिनिटांपर्यंत सुकर्म योग राहील. तसेच या दिवशी रात्री ८ वाजून वाजेपर्यंत हस्त नक्षत्र जागृत असेल. अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १० मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल. राहुकाल सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांपासून ते सकाळी ९.५४ मिनिटांपर्यंत असेल. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच चंद्र कन्या राशीत स्थित असेल. नेमकं आजच्या दिवशी मेष ते मीन राशींचं नशीब कसं बदलणार हे पाहूया…
२० जानेवारी पंचांग आणि राशीभविष्य ( Today Aries To Pisces Horoscope 2025)
मेष:- तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल.
वृषभ:- मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी.
मिथुन:- स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.
कर्क:- उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल.
सिंह:- आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका.
कन्या:- मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.
तूळ:- जवळची व्यक्ति भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल.
वृश्चिक:– कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.
धनू:- अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल.
मकर:- जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो.
कुंभ:- जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
मीन:- व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात.