Shani Nakshtra Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्म, न्याय, दुःख, रोग, पीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, इत्यादी विषयांमधील प्रभावशाली व निर्णायक ग्रह मानला जातो. याचा अर्थ असा की मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात. एखाद्या व्यक्तीला दुःखातून सावरण्यासाठी किंवा दुःख सहन करायला लावण्यासाठी शनीचे त्याच्या कुंडलीतील अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. शनीची चाल जेव्हा बदलते तेव्हापासून हे चांगले किंवा वाईट परिणाम स्पष्ट दिसू लागतात. वर म्हटल्याप्रमाणे शनी केवळ कष्टच नव्हे तर सुकर्माला घवघवीत यश व आनंद सुद्धा देऊ करतो. काही दिवसांपूर्वीच शनीने आपल्या गोचर कक्षेत पुढे जात नक्षत्र परिवर्तन केले आहे. शनी आता पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात स्थिरावले आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार साधारण २०० वर्षांनी असा योगायोग जुळून आला आहे. शनी जयंतीला सुद्धा शनीचे या नक्षत्रात वास्तव्य असेल व त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात त्यांच्या कर्मानुरूप अच्छे दिन येणार आहेत. धन- धान्य समृद्धीची वृद्धी घडवणारा कालावधी नेमक्या कुणाच्या वाट्याला येणार हे पाहूया..

शनीचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ राशींना देणार गडगंज श्रीमंती

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनीचे नक्षत्र परिवर्तन आपल्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. आपल्याला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ संभवतो. आपण ज्या कामासाठी मागील अनेक वर्षे मेहनत करत होतात ते काम यंदा पूर्ण झाल्याने तुमचे अडकून पडलेले यश व धन सुद्धा प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये गती अनुभवाल. नोकरीच्या ठिकाणी चालू असलेली भांडणे दूर होतील. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने नव्याने अनेकांचा विश्वास संपादित करू शकाल. व्यापारी वर्गाला प्रचंड लाभ अनुभवता येईल. भांडवलाचे प्रश्न मार्गी लागतील. हा कालावधी तुम्हाला आत्मविश्वासात वाढ देऊन जाईल.

Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

शनीचे नक्षत्र परिवर्तन आपल्यासाठी लाभदायक असणार आहे. वडिलांसह आपले नाते भक्कम होईल. समाजातील मान-सन्मान वाढीस लागेल. तुम्ही संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत असल्यास या कालावधीत आपल्याला यश लाभू शकते. धनलाभासाठी आपले पूर्वकर्म कारण ठरेल. तुम्ही एखाद्याला केलेली मदत तुमच्याकडे तिप्पटीने परत येऊ शकते. काही नव्या संधी निर्माण होतील पण तुमच्यासाठी निर्णय घेणे सुद्धा कठीण होईल. प्रवासाचे योग आहेत. कामाच्या निमित्ताने तुम्हाला विमान प्रवास घडू शकतो. पोटाचे विकार संभवतात त्यामुळे अगोदरच काळजी घेणे आवश्यक.

हे ही वाचा<< १३ मे पंचांग: सिंह, तूळ, वृश्चिकसह ‘या’ राशींचा आठवडा होईल जोशात सुरु; कुणाच्या राशीत चमकतील सूर्य- चंद्र, वाचा भविष्य

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

शनीच्या स्वामित्वाची व एकार्थी लाडकी रास म्हणजे कुंभ. जानेवारी २०२३ पासून स्वतः शनीदेव या राशीत स्थिर आहेत. शनीने नक्षत्र परिवर्तन केल्याने पूर्वाभाद्रपद नक्षत्राचे बळ कुंभेच्या पाठीशी येणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वाला या काळात झळाळी मिळेल, तसेच तुमच्याकडून योग्य निर्णय घेतले जातील. विवाहित व्यक्तींना आयुष्यात प्रेमाचा गोडवा अनुभवता येईल. तुमच्या रूपात तुमच्या जोडीदाराला धनलाभ होऊ शकतो. घरी- दारी सुखाची अनुभूती येईल. भागीदारीच्या व्यवसायात यश लाभेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)