Shani Nakshtra Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्म, न्याय, दुःख, रोग, पीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, इत्यादी विषयांमधील प्रभावशाली व निर्णायक ग्रह मानला जातो. याचा अर्थ असा की मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात. एखाद्या व्यक्तीला दुःखातून सावरण्यासाठी किंवा दुःख सहन करायला लावण्यासाठी शनीचे त्याच्या कुंडलीतील अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. शनीची चाल जेव्हा बदलते तेव्हापासून हे चांगले किंवा वाईट परिणाम स्पष्ट दिसू लागतात. वर म्हटल्याप्रमाणे शनी केवळ कष्टच नव्हे तर सुकर्माला घवघवीत यश व आनंद सुद्धा देऊ करतो. काही दिवसांपूर्वीच शनीने आपल्या गोचर कक्षेत पुढे जात नक्षत्र परिवर्तन केले आहे. शनी आता पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात स्थिरावले आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार साधारण २०० वर्षांनी असा योगायोग जुळून आला आहे. शनी जयंतीला सुद्धा शनीचे या नक्षत्रात वास्तव्य असेल व त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात त्यांच्या कर्मानुरूप अच्छे दिन येणार आहेत. धन- धान्य समृद्धीची वृद्धी घडवणारा कालावधी नेमक्या कुणाच्या वाट्याला येणार हे पाहूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा