Shukra Planet Transit In Tula: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सर्वच ग्रह हे वेळोवेळी मार्गक्रमण व गोचर करत असतात. याचा थेट प्रभाव हा मानवी जीवनावर दिसून येतो. यातील काही ग्रहांचे संक्रमण अधिक बलवान असते तर काहींचा प्रभाव अगदीच नगण्य असतो. यावेळेस १८ ऑक्टोबरला बलवान अशा शुक्राचे गोचर होणारआहे. शुक्र देव दिवाळीपूर्वीच तूळ राशीत संक्रमण करणार आहेत. विशेष म्हणजे तूळ ही शुक्राची मूळ त्रिकोण रास आहे. शुक्र गोचरामुळे सर्वच राशींवर प्रभाव पडणार असला तरी ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे मार्गक्रमण अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकते. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे आपण जाणून घेऊयात..
कन्या
शुक्र देवाचे गोचर आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते. शुक्र गोचरासह कन्या राशीच्या कुंडलीत दुसऱ्याच स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान वाणीशी संबंधित नोकरी करणाऱ्यांना आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. तसेच धनलाभासाठी उत्तम योग आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतो परिणामी आनंद अधिक असेल. तुम्हाला घरगुती कार्यक्रमात नातेवाईक व जोडीदाराकडून मान सन्मान मिळण्याची चिन्हे आहेत. तुमच्या भावंडाची साथ लाभू शकते. जर आपण मीडिया, मार्केटिंग, शिक्षण अशा क्षेत्रात प्रगतीचे अधिक बलशाली संकेत आहेत.
धनु
शुक्र देवाचे तूळ राशीत संक्रमण हे करिअरसह सर्वच क्षेत्रात आपल्यासाठी शुभवार्ता घेऊन येऊ शकेल. शुक्र गोचरसह धनु राशीच्या कुंडलीत ११ व्या ठिकाणी विराजमान होणार आहे. हे स्थान धनलाभ व शांतीसाठी शुभ मानले जाते. शुक्र गोचराने आपल्याला व्यापार वृद्धीचे योग आहेत तसेच आपल्याला मिळकतीचे अन्य स्रोतही उपलब्ध होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा उत्तम योग आहे पण अजिबात धसमुसळेपणा करू नका. तुमचे जोडीदारासह संबंध नीट होण्यासही हा काळ मदतीचा ठरू शकतो.
शनिची साडे साती ‘या’ राशींसाठी ठरू शकते भाग्यशाली; ज्योतिषशास्त्र सांगतं असं नेमकं का होतं?
मकर
शुक्र देव गोचर करून अनेकांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण येण्याचे योग बनत आहेत. यातीलच तिसरी व महत्त्वाची रास असणार आहे मकर. शुक्र गोचर होताच मकर राशीत शुक्र दहाव्या स्थानी विराजमान होतील. हे स्थान शुभ मानले जात असल्याने अशा व्यक्तींना रोजगार संबंधी शुभवार्ता मिळू शकते. जे अगोदरच नोकरी करत आहेत त्यांना प्रगतीचे तर जे नोकरी शोधत आहेत त्यांना उत्तम पगाराचे पॅकेज मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही प्रॉपर्टीच्या बाबत कोणता नवीन निर्णय घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी पुढील काही महिने हे शुभ असणार आहेत. तुमचा खर्च नाही तर उलट गुंतवणूक वाढून प्रगती होऊ शकते.
(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)