Chandra Grahan 2023: ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहांच्या हालचालीनुसार पृथ्वीवर सूर्य व चंद्र ग्रहण घडत असते. या ग्रहणाचा मानवी जीवनावर व पृथ्वीवर परिणाम प्रत्यक्ष व अपत्यक्ष रित्या जाणवू शकतो. २०२३ या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण येत्या बुद्ध पौर्णिमेला लागणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार या चंद्र ग्रहणाचा प्रभाव १२ राशींवर शुभ- अशुभ स्वरूपात दिसून येऊ शकतो. मात्र काही राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी चंद्र ग्रहण हे अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते. यंदाचे पहिले चंद्र ग्रहण कधी असणार, ग्रहणाचा कालावधी व त्यामुळे भाग्योदयाची संधी असलेल्या तीन राशी कोणत्या हे जाणून घेऊया…
चंद्र ग्रहण लागताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? (Lunar Eclipse Lucky Zodiac Signs)
धनु (Dhanu Zodiac)
धनु राशीच्या मंडळींसाठी चंद्र ग्रहण हे अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात आपल्याला व्यवसाय वृद्धीचे संकेत आहेत. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा प्रचंड लाभ होऊ शकतो. तुमच्या मित्राच्या माध्यमातून धनलाभाचे योग आहेत. जुने आजार डोके वर काढू शकतात, त्यामुळे आरोग्याची हेळसांड करणे टाळावे. उन्हापासून विशेष सावधान राहा. तुम्हाला इतरांच्या बोलण्यात अडकण्याचा स्वभाव नुकसान पोहोचवू शकतो. नीट अभ्यास करून आपल्या मतावर ठाम राहा. या काळात आपण एखादे नवे काम सुद्धा सुरु करू शकता. तुम्हाला प्रॉपर्टी व वाहन खरेदीची संधी मिळू शकते.
कन्या राशि (Kanya Zodiac)
चंद्र ग्रहण लागताच कन्या राशीच्या मंडळींवर श्रीगणेश व लक्ष्मी मातेच्या कृपाशिर्वादाचा वर्षाव होऊ शकतो. विशेषतः नोकरदार मंडळींसाठी येणारा काही काळ हा प्रचंड लाभदायक ठरू शकतो. संतती प्राप्तीसाठी कन्या राशीच्या मंडळींना शुभ योग आहे तर विद्यार्थी दशेतील कन्या राशीच्या मंडळींना अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. जुने वाद संपुष्टात येऊ शकतात.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीच्या मंडळींसाठी चंद्र ग्रहण हे आर्थिक लाभाचे असू शकते. या काळात आपल्याला कामामुळे प्रसिद्धी लाभण्याची संधी आहे. येत्या काही दिवसांमध्ये वडिलांसह जुने वाद बाजूला होऊन आपले नाते अधिक दृढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभू शकते. या काळात तुम्हाला प्रवासाचे योग आहेत.
हे ही वाचा<<५ एप्रिल २०२३ पर्यंत ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? मंगळ गोचर देणार प्रचंड धनलाभ व श्रीमंतीचा योग
चंद्र ग्रहण कधी आहे? (When Is Lunar Eclipse)
बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच ६ मे २०२३ ला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहण काळ सुरु होणार आहे तर मध्यरात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत चंद्र ग्रहण असेल. चंद्र ग्रहण हे भारतासह दक्षिण पश्चिम युरोप व आशिया खंडातून दिसू शकत. ग्रहण कालावधी तब्बल ४ तास ८ मिनिटे असणार आहे पण या ग्रहणास सुतक काळ नसेल.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)