Satyanarayan Puja Vrat List 2023: नव्या वर्षाची सुरुवात झाली आहेत. आपणही आतापर्यंत येत्या वर्षातील मुख्य सण व उत्सव त्यानुसार येणाऱ्या सुट्ट्या पाहिल्या असतील. नसतील तर इथे पाहू शकता. दरम्यान येत्या वर्षात पूजा विधी, लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्त येत आहेत. यापूर्वी आपण विवाह मुहूर्ताची यादी पाहिली आणि आज आपण येत्या वर्षातील सत्यनारायण पूजेचे मुहूर्त जाणून घेणार आहोत. हिंदू पंचांगानुसार, सत्यनारायण पूजेसाठी दर महिन्यातील शुक्ल पक्ष हा शुभ काळ मानला जातो. तर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
भगवान सत्यनारायण हे विष्णूचे रूप मानले जाते. सत्यनारायण पूजा केल्याने धन, वैभव, समृद्धी प्राप्त होत असल्याची मान्यता आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा केली जाते.नववर्षात सत्यनारायण पूजेचा पहिला मुहूर्त ६ जानेवारीला आहे. यानंतर नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये सत्यनारायण पूजेसाठीचे मुहूर्त खालीलप्रमाणे:
- 6 जानेवारी – पौष पौर्णिमा
- 5 फेब्रुवारी – माघ पौर्णिमा
- 7 मार्च- फाल्गुन पौर्णिमा
- 5 एप्रिल – चैत्र पौर्णिमा
- 5 मे – वैशाख पौर्णिमा
- 3 जून- ज्येष्ठ पौर्णिमा
- 3 जुलै – आषाढ़ पौर्णिमा
- 1 ऑगस्ट – श्रावण पौर्णिमा
- 30 ऑगस्ट – श्रावण पौर्णिमा
- 29 सप्टेंबर – भाद्रपद पौर्णिमा
- 28 ऑक्टोबर – अश्विन पौर्णिमा
- 27 नोव्हेंबर – कार्तिक पौर्णिमा
- 26 डिसेंबर – मार्गशीर्ष पौर्णिमा
हे ही वाचा<< मकरसंक्रांतीपासून ‘या’ ३ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; शनि-शुक्र युती ‘या’ मार्गाने बनवू शकते मालामाल
सत्यनारायण पूजेचं महत्त्व
असं म्हणतात, भगवान सत्यनारायणाची व्रत व पूजा केल्याने घरी सुख समृद्धी येऊ शकते. इतकेच नाही तर सत्यनारायण पूजेची व्रतकथा ऐकणाऱ्यालाही सुखाची प्राप्ती होत असल्याची मान्यता आहे. सत्यनारायण व्रत प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यातही लाभदायक मानली जाते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)