Shani Sade Sati And Dhaiyaa In 2023: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह इतर राशींमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या राशीतील इतर ग्रहांच्या युतीने अनेक योग बनायला सुरुवात होते. याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. सर्व ग्रहांमध्ये शनिचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण शनिच्या चालीवरून कोणत्या राशीची साडेसाती सुरु होईल याविषयी माहिती मिळते. नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये शनिदेव गोचर करून कुंभ रहित विराजमान होणार आहेत. १७ जानेवारीला शनिच्या गोचरासह काही राशींना साडेसातीतुन मुक्ती मिळणार आहे तर काही राशींवर साडेसाती व ढैय्याचा प्रभाव सुरु होणार आहे. अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना पुढील काही काळ शनिच्या साडेसातीचा प्रभाव सहन करावा लागू शकतो हे आपण पाहुयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनि ढैय्या म्हणजे काय?

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनि कोणत्याही राशीच्या चौथ्या किंवा आठव्या स्थानी विराजमान होतो तेव्हा त्या स्थितीला ढैय्या असे म्हणतात राशीतील चौथे स्थान हे मानसिक सुख व भौतिक सुखाचे स्थान आहे तर आठवे स्थान हे दुर्घटना किंवा आयुष्यमान ठरवणारे स्थान मानले जाते. जेव्हा आपल्या चंद्र राशीत शनि या स्थानावर गोचर करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ढैय्या प्रभाव सुरु झाल्याचे मानले जाते. शनिच्या ढैय्याचा प्रभाव हा अडीच वर्षांपर्यंत कायम असतो.

शनि ढैय्या कोणत्या राशीत सुरु होणार?

ज्योतिषांच्या माहितीनुसार, १७ जानेवारी २०२३ ला वृश्चिक राशीत शनि ढैय्या प्रभाव सुरु होणार आहे. कर्क राशीत शनिदेव आठव्या स्थानी तर ववृश्चिक राशीत शनिदेव चौथ्या स्थानी गोचर करून स्थिर होणार आहेत. ज्या राशींवर शनि ढैय्या प्रभाव सुरु होईल त्यांना पुढील काही महिने तरी सांभाळून राहणे हिताचे ठरेल. ढैय्या किंवा साडेसातीचा पहिला टप्पा हा गंभीर मानला जातो, याकाळात प्रवासादरम्यान तसेच महत्त्वाचे निर्णय घेताना पूर्ण विचार करावा.

२०२३ मध्ये ‘या’ राशींची शनिच्या साडेसातीतून होणार मुक्ती; जानेवारीपासून धनलाभ व नोकरीत प्रगतीचा मोठा योग

शनि ग्रह कुंभ राशीत गोचर करताच मीन राशीची साडेसाती सुरु होणार असल्याचे म्हंटले जात आहे, म्हणजेच जानेवारी २०२३ पासून कुंभ, मकर आणि मीन राशीत शनिची साडे साती सुरु होणार असे संकेत आहेत.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2023 shani sade sati and dhaiya effect to begin on three zodiac signs be alert about money accident and family svs