Mangal Uday In Dhanu 2024: प्रत्येक ग्रह आपल्या गोचर कक्षेत असताना वेळोवेळी उदय, अस्त, मार्गी, वक्री होत असतो. याचा एकूण परिणाम १२ राशींवर कमी-अधिक, शुभ- अशुभ स्वरूपात होत असतो. आता नव्या वर्षात एका महत्त्वच्या ग्रहाचा उदय होणार असल्याचे समजतेय. वैदिक ज्योतिषशास्त्रात साहस, पराक्रम, धन, वैभव व कर्तृत्वाचा म्हणून ओळखला जाणारा ग्रह मंगळ ग्रह २०२४ मध्ये उदित होणार आहेत. १४ जानेवारीलाच मंगळाचा धनु राशीत उदय होणार आहे. २१ सप्टेंबरपासून मंगळ धनु राशीतच भ्रमण करत आहे, तर १४ जानेवारी २०२४ ला उदय होऊन धनु राशीतच मंगळ स्थिर असणार आहे, पण या कालावधीत मंगळ अधिक शक्तिशाली होण्याचे संकेत आहेत. परिणामी प्रभावित पाच राशी अशा आहेत ज्यांना येत्या काळात व्यक्तिमत्वाला आलेली झळाळी अनुभवता येऊ शकते. धन- धान्य, संपत्तीचा वर्षाव या राशींवर काही विशिष्ट व्यक्तींच्या माध्यमातून होऊ शकतो. अशा या राशी कोणत्या हे पाहूया..
२०२४ मध्ये ‘या’ ५ राशींना मंगळ मिळवून देईल लक्ष्मीकृपा
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रहाचा उदय होणे ही स्थिती मेष राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत मंगळ नवव्या स्थानी उदित होणार आहे. अशावेळी मेष राशीचे मंडळी नशीबवान ठरतील. आपल्या योजना पूर्णत्वास जाऊ शकतात. या कालावधीत आपल्याला कामाच्या ठिकाणी नवनवीन संधी दिसू लागतील. नव्या नोकरीची ऑफर सुद्धा येऊ शकते. व्यवसायात खूप दिवसांपासून अडकून पडलेले धन पुन्हा मिळू शकते. जमिनीच्या व्यवसायासाठी हा कालावधी शुभ सिद्ध होऊ शकतो.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
सिंह राशीच्या मंडळींसाठी मंगळ देव उदय होणे हे शुभ मानले जात आहे. या राशीच्या पाचव्या स्थानी मंगळ सक्रिय असणार आहे. संततीप्राप्तीशी जोडून एखादी गोड बातमी मिळू शकते. तुम्हाला मुलांच्या रूपात खूप समाधान व अभिमान अनुभवता येऊ शकतो. पुनर्विवाहाचा योग आपल्या राशीत दिसून येत आहे. वाहन व संपत्तीसंदर्भात भाग्योदयाचा हा कालावधी असू शकतो. व्यवसायाच्या निमित्ताने यात्रेचा/ प्रवासाचा योग येऊ शकतो.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
तूळ राशीसाठी मंगळाचा आपल्या राशीतील उदय लाभदायक सिद्ध होऊ शकतो. मंगळ ग्रह आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत तिसऱ्या स्थानी उदय स्थितीत असणार आहे. अशावेळी या मंडळींचे साहस व पराक्रम करण्याची शक्ती वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढू शकतो. आयुष्यात नव्याने प्रेमाचा अनुभव घ्या. शुभ वार्ता कानी येतील, आयुष्याचा वेग वाढेल. भावंडांच्या रूपात धनलाभाचे संकेत आहेत. एखादी परदेशवारी घडू शकते. नोकरी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. बँक बॅलन्समध्ये प्रचंड वाढ घडवून आणेल अशी एखादी संधी चालून येऊ शकते.
वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)
२०२४ मध्ये वृश्चिक राशीच्या मंडळींना शुभ फळप्राप्ति होऊ शकते. मंगळ आपल्या राशीच्या धनस्थानी उदय करणार आहेत. त्यामुळे अचानक व अनपेक्षित स्वरूपात धनलाभ होऊ शकतो. आयुष्याच्या जोडीदारसह नाते सुधारण्यास मदत होईल. उधार दिलेले पैसे न मागता अचानक परत मिळू शकतील. जोडीदारामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने मानसिक स्थैर्य सुद्धा अनुभवता येईल.
हे ही वाचा<< ३० वर्षांनी २०२४ मध्ये शनी महाराजांची ‘या’ राशीत युती; दुप्पट वेगाने वाढू शकतो बँक बॅलन्स, श्रीमंती येईल तुमच्या दारी
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
मंगळ ग्रह धनु राशीत लग्न स्थानी उदय स्थितीत असणार आहे. या मंडळींचा स्वभाव मुळातच साहसी नाही पण आगामी वर्षात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ते अगदी सहज धाडस दाखवू शकतील. कुटुंबातील मंडळींची साथ लाभेल. या कालावधीत संपत्ती विशेषतः घर किंवा वाहनाच्या रूपात खरेदी करता येऊ शकते. तुम्हाला शेअर बाजारातून किंबहुना एकत्रितच गुंतवणुकीतून पैसे अधिक प्राप्त होऊ शकतात. नोकरदार मंडळींसाठी कालावधी शुभ असेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)