Shani Major Changes in 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव हे कलियुगातील न्याय देवता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम शनी देव करतात असे मानले जाते. शनीच्या प्रभावावर त्याच्या मार्गक्रमण स्थितीचा प्रचंड परिणाम होत असतो, म्हणजेच जेव्हा शनीदेव मार्गी होत असतात तेव्हा त्यांचा प्रभाव हा थेट असतो, शनीचा अस्त होत असताना प्रभावही काहीसा मावळतो आणि उदय होत असताना प्रभाव सक्रिय होऊ शकतो. अशा प्रकारच्या तीन हालचाली शनीदेव येत्या नववर्षात करणार आहेत, शनीच्या पुढील चालीविषयी व त्याचा शुभ प्रभाव नेमका कोणत्या राशींवर दिसून येऊ शकतो याबाबत आपण ज्योतिषीय अनुषंगाने जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शनी सर्वात आधी ११ फेब्रुवारी २०२४ ला अस्त होणार आहेत त्याच स्थितीमध्ये शनीदेव ३७ दिवस असतील त्यानंतर १८ मार्च २०२४ ला शनी पुन्हा उदित स्थितीत येणार आहेत. यानंतर २९ जून २०२४ ला शनी देव वक्री स्थितीत येणार आहेत. शनीच्या या तिन्ही हालचाली स्वराशीचा कुंभ मध्येच होणार आहेत मात्र स्थितीच्या बदलानुसार अन्य राशींवरील प्रभाव कमी- जास्त होणार आहे. याचा शुभ- अशुभ प्रभाव नेमक्या कोणत्या राशींवर होईल व त्यांना नेमके कोणते फायदे- तोटे होऊ शकतात हे पाहूया..

२०२४ मध्ये शनीच्या मुख्य तीन हालचाली, तुमच्यावर प्रभाव कसा होणार?

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शनीदेव जेव्हा चाल बदलतील तेव्हा वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक कालावधी सुरु होऊ शकतो. विशेष म्हणजे नोकरी व्यवसायात तुम्हाला प्रचंड यश हाती येऊ शकते. तुमच्या कुंडलीत बदलाचे संकेत आहेत. याचा अर्थ तुम्हाला तुमचे वास्तव्याचे ठिकाण किंवा नोकरीची जागा काही कारणास्तव बदलावी लागू शकते. हा बदलच तुमच्या नशिबाला आलेली मरगळ दूर झटकून देण्यासाठी मदतीचा ठरू शकतो. नव्या नोकरीसह आपल्याला होणारा आर्थिक फायदा सुद्धा वाढण्याची चिन्हे असल्याने अनेक महत्त्वाकांक्षी गोष्टी आपण करू शकणार आहात. बँक बॅलन्स वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीच्या मंडळींना २०२४ मध्ये शनीची दृष्टी खूपच फायदेशीर सिद्ध होऊ शकते. आपण एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता, नोकरी करणाऱ्या मंडळींना सहकाऱ्यांची साथ लाभेल. तुमचे म्हणणे इतरांना पटू लागल्याने तुमच्या शब्दाचा मान वाढू शकतो. कोर्टाच्या खटल्यांमधून यश हाती येईल. तुम्ही तुमचे हितशत्रू या कालावधीत ओळखू शकाल ज्यामुळे तुमच्या भविष्यातील अनेक अडथळ्यांना आधीच आळा बसू शकतो. एकांत हवाहवासा वाटू शकतो. वैवाहिक आयुष्यात काही सुखाचे क्षण अनुभवू शकणार आहात.

हे ही वाचा<< २ जानेवारी २०२४ ला बुध ग्रहाचं वर्षातील सर्वात मोठं परिवर्तन; ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी, सुरु होईल ‘राज’काळ

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

शनीची स्वतःची रास म्हणजेच कुंभ, २०२४ मध्ये कुंभ राशीतच शनीचे वास्तव्य असणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा बदल हा कुंभ राशीतच इतर राशींच्या तुलनेत अधिक प्रभावी असणार आहे. कुंभ राशीच्या प्रथम स्थानी असणारा शनी प्रभाव तुम्हाला प्रगतीच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवू शकतो. शनी हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने त्याचा प्रभाव तुमच्यावर शुभ असणार आहे परिणामी शनीचा मार्च महिन्यात उदय झाल्याने आपल्याला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला भागीदारीच्या व्यवसायात अधिक फायदा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)