Shani Transit Impact: ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव हे न्याय देवता म्हणून ओळखले जातात. जर एखादी व्यक्ती चांगले काम करत असेल तर त्याच्या कर्मानुरूप त्याला फळ देत शनीदेव श्रीमंत करतात तर एखाद्या व्यक्तीला कुकर्माची शिक्षा सुद्धा ते तितक्याच कठोरपणे देतात. म्हणूनच शनीला ग्रहांमध्ये कर्मदेवता अशी सुद्धा ओळख आहे. २०२४ या वर्षात शनीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा तीन बदलांचे योग जुळून येणार आहेत. ज्याचा प्रभाव निश्चितच कमी- अधिक प्रमाणात व शुभ-अशुभ स्वरूपात सर्वच १२ राशींवर पाहायला मिळू शकतो. पण वैदिक ज्योतिषशास्त्राचा व ग्रहमानाचा अभ्यास केल्यास हे लक्षात येते की १२ पैकी काही अशा राशी आहेत ज्यांना शनीच्या बदलत्या चालीचा सर्वाधिक शुभ परिणाम मिळू शकतो. या राशी २०२४ च्या वर्षभरात अत्यंत धनवान व कर्तबगार सिद्ध होणार आहेत. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०२४ मध्ये शनीदेव तीन वेळा बदलणार स्थान; ‘या’ राशींचा वाढेल मान

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ मध्ये शनीच्या बदलणाऱ्या चालीचा प्रभाव वृषभ राशीवर अनुकूल स्वरूपात दिसून येऊ शकतो. प्रेम प्रकरणात यश लाभेल. आयुष्यात नवीन व्यक्तींचा प्रवेश होईल. एखादा मोठा प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकाल ज्यामुळे आर्थिक अडचणी सुद्धा मार्गी लागतील. तुम्हाला पती- पत्नी किंवा जोडीदाराच्या रूपात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. आरोग्याची हेळसांड अजिबातच करू नये. आर्थिक स्थितीत सुधारणा होत असताना अधिकाधिक भर गुंतवणुकीवर द्यावा.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीला या वर्षात शनीचा आशीर्वाद लाभणार आहे, ज्याची सुरुवात जानेवारी महिन्यापासूनच झाली आहे असे म्हणता येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने निर्णय येतील ज्यामुळे तुम्हाला यंदाच्या वर्षात चांगली पदोन्नती व भरघोस पगारवाढ लाभू शकते. करिअरमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायातुन दुप्पटीने फायदा होऊ शकतो. प्रेमाची रखडलेली गाडी रुळावर येऊ शकते. आई वडिलांच्या आरोग्याबाबत चिंता राहील.

हे ही वाचा<< वृश्चिक राशीत यंदा सर्वात मोठा ग्रहबदल! ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत धनलाभ, हितशत्रू व आरोग्याची स्थिती कशी असेल, वाचा

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

२०२४ या वर्षात शनीदेवाचा कुंभ राशीतच वास असणार आहे. शनी हे कुंभ राशीचे स्वामी आहेत त्यामुळे सहसा ते या राशीस कष्ट देत नाहीत. मात्र २०२४ हे वर्ष पूर्णपणे फायद्याचे ठरावे असे वाटत असल्यास कुंभ राशीच्या मंडळींना सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास तुमच्या यशाची किल्ली ठरेल. तुमचे मुद्दे मांडताना इतरांना दुखावू नका. धनलाभासाठी तुमच्या वाणीची खूप मदत होऊ शकते. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग वाढू शकतो. आर्थिक मदतीसाठी अनेक हात पुढे येतील. संधी हेरताना सद्सद्विवेकबुद्धी वापरा. पोटाची काळजी घ्यावी लागेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)