उल्हास गुप्ते

Shani Effect On Politicians: २०२४ हे वर्ष लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीला अनेकांना या वर्षात नेमके काय घडणार याविषयी कुतूहल असतेच. राजकीय उलाढालींसाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यावर शनीचा जबरस्त प्रभाव दिसून येईल अशी चिन्हे आहेत. ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा म्हणजे संख्याशास्त्रात शून्याला फार महत्व आहे. जेव्हा जेव्हा संपूर्ण तारखेत शून्य अधिकवेळा येते तेव्हा ती तारीख क्रांतीकारक ठरते. इतकेच नव्हे तर ज्या अंकाच्या मागे शून्य येते त्या अंकाच्या सद्गुणांची बऱ्याच प्रमाणात वाढ दिसून येते. तर हळव्या अंकामागे उभे राहणारे शून्य दु:खाचे डोंगर उभे करते.

government to stop tendering process in midday meals
शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार? 
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Loksatta article Regarding questions on cultural issues raised in the Assembly print politics news
मावळतीचे मोजमाप: सांस्कृतिक विषयांवर केवळ चर्चा
Indian businessmen rata tata
भारताच्या प्रगतीसाठी अतूट बांधिलकी, प्रमुख उद्योगपतींकडून रतन टाटा यांना आदरांजली
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
rss preparing to celebrates its centenary on october 12 vijaydashami
संघाच्या विजयादशमी उत्सवाची तयारी सुरू; सरसंघचालकांचे यंदाचे भाषण महत्त्वाचे का ? 
history of panchayati raj 73rd amendment of panchayati raj in india
संविधानभान : सहभागी लोकशाहीकडे वाटचाल
Loksatta chatusutra Supreme Court 21st Article Krishna Iyer UAPA
चतुःसूत्र: जामीन हा नियम, तुरुंगवास अपवाद!

२०२४ मध्ये शनीचा प्रभाव असणार प्रबळ, जगात कोणते बदल घडणार?

यावर्षी नवीन येणारे २०२४ हे साल २०२० प्रमाणेच क्रांतीकारी ठरणार आहे. २०२० मधील शून्य किती महाभयंकर घटना घडवू शकते याचं प्रत्यंतर आपण प्रत्यक्षपणे अनुभवले. तसेच दोन आणि शून्याच्या संयोगातून निर्माण होणारी प्रतिक्रिया उलट्या गतीने किती टोकाची स्फोटक असू शकते, तेही अनुभवले. संपूर्ण मानव जातीचे आरोग्य ध्वस्त करण्याचे काम २०२० या वर्षात झाले. असाच प्रकार पण काहीसा सौम्य प्रमाणात यावर्षी दिसून येईल. २०२४ मध्ये दोन हा अंक दोन वेळा आला आहे. त्याचबरोबर शून्य आणि चार म्हणजे हर्षलचे अस्तित्व खूपसे प्रक्षोभक दाहक ठरणार आहे.

हे ही वाचा<< २०२४ वर सूर्य व शनीचा दांडगा प्रभाव! तुमच्या जन्मतारखेनुसार नाती, शिक्षण व धनाच्या फायद्या-तोट्याची गणितं, पाहा

राजकारण्यांना दणका

२०२४ म्हणजे २+०+२+४ = ८ हा अंक शनी ग्रहाचा. या अंकावर शनीचा अंमल असतो. शनी हा सत्यवचनी, कठोर न्यायी वृत्तीचा असल्यामुळे या देशातील न्याय व्यवस्था चोख ठेवण्याचे काम शनी उत्तमपणे पार पाडील. त्यामुळे गुन्हेगारी, ढोंगी नेतृत्व करून लुबाडणाऱ्या नेत्यांना मोठा दणका बसेल व निश्चितपणे जनतेला एक मोठा सुखद धक्का मिळेल. जसा माणसाच्या मनाचा उद्रेक असतो असाच निसर्गाचा उद्रेक अतिवृष्टी, महापूर आणि भूकंप यातून दिसून येईल. यात माणसांनी आपली मानसिक स्थिती, शारिरीक स्थिती सांभाळून जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यातून आपण सहज स्वत:ला सावरू शकू.