20th August Panchang & Marathi Rashi Bhavishya :  २० ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी मंगळवारी रात्री ८ वाजून ३३ पर्यंत राहील. शतभिषा नक्षत्र दुपारी ३ वाजून १० मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत गुरु मृगाशिरा नक्षत्रात प्रवेश करेल. आज राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. मेष ते मीन राशीसाठी मंगळावर कसा असणार हे आपण जाऊन घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० ऑगस्ट पंचाग व राशीभविष्य :

मेष:- संगत योग्य आहे काय ह्याचा विचार करा. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्‍याची गाठ पडेल. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. खर्चात वाढ होऊ शकते.

वृषभ:- जुने वाद संपुष्टात येतील. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पट‍वून द्या. दिवस आनंदात घालवाल.

मिथुन:- व्यायामाला नव्याने सुरवात करा. उत्तम भाषाशैली वापराल. व्यवसायात एखादा प्रयोग कराल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बचतीच्या योजना आखाल.

कर्क:- अति हळवे होऊ नका. भौतिक सुखात वृद्धी होईल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

सिंह:- तुमची लोकप्रियता वाढेल. जुने छंद जोपासावेत. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

कन्या:- श्रमाला घाबरून चालणार नाही. उगाचच कच खाऊ नका. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

तूळ:- अनाठायी बडबड टाळावी. झोपेची तक्रार जाणवेल. आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

वृश्चिक:- आरोग्यासाठी हितकारक अशा गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका. ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील. रूचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल.

धनू:- आपला लोकसंग्रह वाढीस लागेल. जवळचा प्रवास सुखकारक होईल. अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल.

मकर:- नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. इतरांना आनंदाने मदत कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

कुंभ:- खोल विचार करण्याची तयारी ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल.

मीन:- जोडीदाराची प्रगती दिसून येईल. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल. धार्मिक कामात रस घ्याल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. पथ्यपाणी चुकवू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20th august 2024 mangalvar rashi bhavishya guru mrugashira nakshatra shravan shukla paksha pratipada tithi will get mesh to mean zodiac signs money love luck daily horoscope in marathi asp
Show comments