20th July 2024 Marathi Rashibhavishya: २० जुलै २०२४ ला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी असणार आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत चतुर्दशी तिथी कायम असेल. शनिवारचा संपूर्ण दिवस पार करून २१ जुलैच्या मध्यरात्री १ वाजून ४९ मिनिटांपर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच २१ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत वैधृती योग कायम असणार आहे. आजच्या दिवशी सुरु कर्क राशीत तर चंद्र धनु राशीत स्थिर असणार आहे. आज सकाळी ९ वाजून २ मिनिटांपासून ते १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे पण अन्यथा हा दिवस शुभ असेल. आजच्या दिवशी तुमच्या राशीला नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

२० जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-आज दिवसभर कार्यरत राहाल. बोलण्यात मधाळपणा बाळगावा. कामासंबंधी मनात संभ्रम बाळगू नका. गणपतीाची उपासना करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल.

rahu transit in shani nakshatra uttarabhadra
राहू देणार बक्कळ पैसा; शनीच्या नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Malavya Rajyog
३६५ दिवसांनी मालव्य राजयोग; सप्टेंबरपासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाचे येणार सुखाचे दिवस?
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Shani transit 2024 Next 216 days earn money
पुढचे २१६ दिवस नुसता पैसा; शनीच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय
Jupiter Nakshatra Transit 202
८९ दिवसांपर्यंत गुरु देणार जगातील प्रत्येक सुख! ‘या’ राशीच्या लोकांच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल पैसाच पैसा
Mangal Gochar 2024 | mangal transit in Gemini rashi
Mangal Gochar 2024 : ५५ दिवसांपर्यंत ‘या’ राशीच्या लोकांची होईल चांदी, २६ ऑगस्टपासून सुरू होणार अच्छे दिन
19th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
रक्षाबंधन, १९ ऑगस्ट पंचांग: श्रावणी सोमवार कर्क, सिंहसह ‘या’ राशींसाठी असणार शुभ-लाभाचा दिवस; तुमचं भाग्य कसं उजळणार? वाचा राशीभविष्य

वृषभ:-गोड बोलून सर्व कामे निभावून न्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. चांगली पुस्तके वाचनात येतील. सहकार्‍यांची मदत घ्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.

मिथुन:-अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांची मनधरणी करावी लागू शकते. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. मैत्रीतील सलोखा कायम ठेवावा.

कर्क:-महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक करा. समोरील व्यक्तीशी वाद टाळावा. अति गोड पदार्थ खाणे टाळावे. दिवस अनुकूल जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

सिंह:-बौद्धिक चातुर्य दर्शवाल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य तडीस न्यावे. हलका आहार घ्यावा. आध्यात्मिक प्रगती करता येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल.

कन्या:-मित्रांची मदत होईल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. नातेवाईकांचा रूसवा काढावा लागेल. लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.

तूळ:-समाधानी दिवस असेल. नवीन कामात समाधानी राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. नवीन प्रकल्पावर काम चालू कराल. मौजमजेवर पैसे खर्च होतील.

वृश्चिक:-आळस झटकून कामाला लागावे. दीर्घ प्रतीक्षेच्या कामात यश येईल. आर्थिक पातळीवर समाधान मिळेल. समोरील संधीचे सोने करावे. कामानिमित्त घराबाहेर राहावे लागू शकते.

धनू:-हातून सेवा घडेल. घरगुती कामे जलद गतीने पार पडतील. जुन्या गोष्टीवर चर्चा टाळावी. पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते.

मकर:-दिवसभर कामात व्यग्र राहाल. घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. चिकाटीने व प्रामाणिकपणे कामे कराल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

कुंभ:-काही गोष्टी अधिकार वाणीने सांगाव्यात. नवीन ओळखी सत्कारणी लागतील. भागीदारीत खुश असाल. नवीन विचारांना चालना द्यावी. मित्र जपून ठेवावेत.

हे ही वाचा<< ३०० दिवस कमावणार बक्कळ पैसा! गुरू ग्रहाच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या लोकांची आर्थिक समस्या होणार दूर

मीन:-कौटुंबिक शांतता बाळगावी. बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा. व्यायामाचे फायदे लक्षात घ्या. व्यापारी वर्गाला अपेक्षित लाभ होईल. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर