20th October 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: पंचागानुसार आज २० ऑक्टोबर रोजी कार्तिक कृष्ण पक्षातील उदया तिथी तृतीया आणि रविवार आहे. रविवारी सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी तृतीया तिथीची सांगता होईल. तर आज कृतिका नक्षत्र सकाळी ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे, त्यानंतर रोहिणी नक्षत्र दिसेल. रविवारी करवा चौथ व्रत पाळण्यात येणार आहे. याशिवाय २० ऑक्टोबरला भगवान श्री गणेशाची संकष्टी चतुर्थी देखील आहे. संकष्टी चतुर्थी व्रत भक्त गणेशाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी करतात.
तसेच कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत करतात आणि चंद्र पाहून उपवास सोडतात. त्यामुळे आज करवा चौथ व्रतही पाळण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रोदय होईल. या दिवशी चंद्र वृषभ राशीत असेल. आजच्या संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ सणाच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या नशिबात काय असणार हे पाहूया..
२० ऑक्टोबर २०२४: संकष्टी चतुर्थी विशेष मेष ते मीन राशींचे भविष्य (Mesh To Meen Rashibhavishya in Marathi)
मेष:- मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. परिचितांना मदत कराल.
वृषभ:- धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. व्यावसायिक उन्नती साधता येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. नवीन लोक संपर्कात येतील.
मिथुन:- ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. बुद्धी चातुर्याचा वापर कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
कर्क:- व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. विलंबित गोष्टी मार्गी लागतील. दिवस माध्यम फलदायी असेल. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. भावनांना आवर घालावा.
सिंह:- आपली मनोकामना पूर्ण होईल. जुनी उधारी वसूल होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा.
कन्या:- शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. बचतीच्या योजना आखाव्यात. अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल.
तूळ:- महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. समोरील गोष्टीत आनंद माना. मुलांची प्रगती दिसून येईल.
वृश्चिक:- वादाचा मुद्दा पटवून देऊ नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात चांगल्या संधि प्राप्त होतील. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
धनू:- मुलांकडून सुवार्ता मिळतील. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधि प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या.
मकर:- विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल.
कुंभ- बोलताना भान हरवू नका. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
मीन:- प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा. आततायीपणे निर्णय घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी नाते दृढ होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर