21st April 2024 Marathi Daily Horoscope: २१ एप्रिलला चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आजच्या रविवारी रात्री १ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्रयोदशी तिथी कायम असेल. २१ एप्रिलचा संपूर्ण दिवस व रात्री सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असेल. पंचांगानुसार आजच्या दिवशी अनंग त्रयोदशी ही तिथी असणार आहे. आज रविवारी प्रदोष व्रत सुद्धा पाळले जाईल. एकूणच ग्रहमानानुसार व पंचांगानुसार मेष ते मीन राशींना आजचा दिवस कसा जाईल हे पाहूया..

२१ एप्रिल पंचांग व राशी भविष्य

मेष:-बोलण्यातून प्रभुत्व दाखवाल. कामात चांगले बदल घडून येतील. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरगुती कामाचा ताण जाणवेल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
Budh Uday In Scorpio 2024 horoscope 2025
Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर

वृषभ:-कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. झोपेची तक्रार जाणवेल. फसवणुकीपासून सावध रहा. लबाड लोकांपासून दूर राहावे.

मिथुन:- सौख्यात रमून जाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. अधिकारी व्यक्तींचा संपर्क होईल. संपर्कातील लोकांचा स्नेह वाढेल.

कर्क:-स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. नवीन मित्र जोडाल. कामाची धांदल उडेल. घरातील स्त्रियांची मदत होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

सिंह:-अती भावनाशील होऊ नका. तुमच्या कलेचे सादरीकरण करता येईल. उष्णतेचा त्रास जाणवेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.

कन्या:-परोपकारी दृष्टिकोन ठेवाल. गुरुकृपेचा लाभ होईल. दिवस काहीसा आरामात घालवाल. गोष्टी मनासारख्या घडून येतील. घरातील थोरांचे सहकार्य लाभेल.

तूळ:-पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून विसंवाद घडू शकतो. गुंतवणुकीचा लाभ घ्यावा. कामाचा वेग वाढेल. घरातील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत.

वृश्चिक:-भावंडांशी मतभेद संभवतात. अनाठायी खर्च होऊ शकतो. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. सहकार्‍याची भावना जपाल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.

धनू:-कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा. बोलताना शब्द जपून वापरावेत. गरज असेल तरच खर्च करावा. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. नसती काळजी करत बसू नका.

मकर:-रागावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडू नका.

हे ही वाचा<< १३९ दिवस शनी उलट चालत ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार ३६० अंशात कलाटणी; प्रचंड श्रीमंती देणार शनैश्वर महाराज

कुंभ:-सामुदायिक गोष्टींचे भान ठेवा. रखडलेले कामे पुढे सरकतील. घरात टापटीप ठेवाल. जवळचे मित्र भेटतील. शेतीच्या कामातून लाभ मिळेल.

मीन:-कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कामातून चांगला धनलाभ होईल. गप्पांमध्ये गुंग व्हाल. कष्टाचे योग्य चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader