21st September 2024 Horoscope and Panchang In Marathi : आज २१ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. सोमवारी रात्री अडीच वाजेपर्यंत पंचमी तिथी राहील. त्याचप्रमाणे ११ वाजून ११ मिनिटांपर्यंत वरियान योग जुळून येईल. मंगळवारी पहाटे ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत मृगाशिरा नक्षत्र जागृत असेल. आज राहू काळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. याशिवाय आज मंगळाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. तर आज सोमवारी महादेवाच्या कृपेने कोणाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येणार आहे हे आपण जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२१ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope and Panchang ) :

मेष:- मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. परिचितांना मदत कराल.

वृषभ:- धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. व्यावसायिक उन्नती साधता येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. नवीन लोक संपर्कात येतील.

मिथुन:- ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. बुद्धी चातुर्याचा वापर कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल.

कर्क:- व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. विलंबित गोष्टी मार्गी लागतील. दिवस माध्यम फलदायी असेल. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. भावनांना आवर घालावा.

सिंह:- आपली मनोकामना पूर्ण होईल. जुनी उधारी वसूल होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा.

कन्या:- शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. बचतीच्या योजना आखाव्यात. अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल.

तूळ:- महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. समोरील गोष्टीत आनंद माना. मुलांची प्रगती दिसून येईल.

वृश्चिक:- वादाचा मुद्दा पट‍वून देऊ नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात चांगल्या संधि प्राप्त होतील. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.

धनू:- मुलांकडून सुवार्ता मिळतील. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधि प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या.

मकर:- विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल.

कुंभ- बोलताना भान हरवू नका. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.

मीन:- प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा. आततायीपणे निर्णय घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी नाते दृढ होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21st october rashibhavishya and panchang in marathi for mesh to meen zodic signs you will get what you want asp
Show comments