Vat Purnima 2024: हिंदू दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. पण, काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो. पौराणिक कथांनुसार, वटपौर्णिमेचे व्रत केल्याने विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचे वरदान लाभू शकते अशीही मान्यता आहे. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. यंदा २१ जून २०२४ ला म्हणजेच शुक्रवारी वटपौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे. योगायोगाने याच दिवशी काही अत्यंत शुभ राजयोग जागृत असणार आहेत ज्याचा प्रभाव काही राशींच्या आयुष्यात दिसून येणार आहे तसेच यादिवशी व्रत करणाऱ्यांना सुद्धा दुप्पटीने लाभ मिळण्याची शक्यता या राजयोगांमुळे निर्माण झाली आहे. तुमची रास सुद्धा तितकी नशीबवान आहे का, हे पाहूया..
वट पूर्णिमा व्रत २०२४ मुहूर्त (Vat Purnima Vrat 2024 Muhurat)
पंचांगानुसार वटपौर्णिमेच्या तिथीची सुरुवात २१ जून २०२४ ला शकलो ७ वाजून ३१ मिनिटांपासून सुरु होणार आहे. तर २२ जून २०२४ ला सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी तिथी समाप्त होईल.
पूजा मुहूर्त – सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत
वट पूर्णिमा २०२४ शुभ योग (Vat Purnima Vrat 2024 Shubh yoga)
वटपौर्णिमेच्या दिवशी तीन राजयोग सक्रिय असणार आहेत. त्रिगही योग, बुधादित्य योग व शुक्रादित्य योग या दिवशी मिथुन राशीत सक्रिय असणार आहे. मिथुन राशीत १४ जूनला बुध ग्रहाने गोचर केले होते, तत्पूर्वी शुक्राने या राशीत प्रवेश घेतला होता. सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश होताच हे तिन्ही राजयोग सक्रिय होणार आहेत. २० जूनला रात्री ८ वाजून १३ मिनिटांपासून ते २१ जूनला संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत हे राजयोग अधिक सक्रिय असणार आहेत.
वट पूर्णिमा २०२४, कुणाचे भाग्य उजळणार?
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीतच सर्व राजयोग निर्माण होत असल्याने आपल्याला लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे पण दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल. अनपेक्षित मार्गातून धनलाभ संभवतो. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल.
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात. अति हट्ट बरा नाही. वैचारिक स्थिरता जपावी. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून धनलाभ संभवतो.
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या. नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका. गप्पा गोष्टींची आवड पूर्ण होईल. मीन राशीच्या मंडळींना वैवाहिक सुख लाभण्याची शक्यता आहे.जोडीदाराचे मन सांभाळण्याचा प्रयत्न करावा. वादाचे मुद्दे सोडवावेत.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)