22nd January 2024 Marathi Horoscope: २२ जानेवारी रोजी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग मृगाशिरा नक्षत्रातच जुळत आहेत. तसेच शुभ मृगाशिरा नक्षत्र सोमवारी (२२ जानेवारी) पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल तर २३ जानेवारीला (मंगळवार) पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत कायम राहील. २२ जानेवारीला अभिजात मुहूर्त सकाळी ११ :५१ ते दुपारी १२ :३३ पर्यंत आहे. या शुभ दिनी आपल्या राशीचे भाग्य कसे उजळणार व कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार हे जाणून घेऊया.

मेष:-व्यावसायिक स्तर सुधारेल. अपेक्षित लाभाची अपेक्षा पूर्ण होईल. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल. कामाची योग्य पावती मिळेल.

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
16 January 2025 panchang and rashi bhavishya
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव

वृषभ:-अपेक्षित लाभाने खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. कमिशनच्या कामातून लाभ होईल. अधिकारी व्यक्तींचा घरात वावर राहील. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

मिथुन:-मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. मदतीचा हात सढळ ठेवाल.

कर्क:-अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक स्थिरता ठेवावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पत्नीशी मतभेद संभवतात.

सिंह:-भागीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. मुलांचे धाडस वाढेल.

कन्या:-पत्नीची उत्तम साथ मिळेल. एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल. भागीदाराशी सुसंवाद साधला जाईल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. प्रलोभनापासून दूर राहावे.

तूळ:-कामातील ऊर्जा वाढेल. हातात नवीन अधिकार येतील. आकर्षणाला बळी पडू नका. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल. नातेवाईकांची मदत घेता येईल.

वृश्चिक:-सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. स्त्रियांशी ओळख वाढेल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. सहवासातून मैत्री घट्ट होईल.

धनू:-घराचे सुशोभीकरण काढाल. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील वातावरण खेळीचे राहील. जवळचा प्रवास घडेल.

मकर:-शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी. आध्यात्मिक बळ वाढवावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

हे ही वाचा<< रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील ‘ही’ ८४ सेकंद आहेत सर्वात खास; जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ

कुंभ:-मानसिक स्थैर्य जपावे. घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे. मित्रांशी मतभेद संभवतात.

मीन:-आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. कामातील बदल जाणून घ्यावेत. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे. फसवणुकी पासून सावध रहा. आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader