22 June 2022 Lucky Zodiac Signs: दररोज ग्रहांची स्थिती बदलल्याने कुंडलीही बदलते. ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती दररोज बदलत असते. २२ जून २०२२ बुधवार आहे. बुधवार हा गणपतीला समर्पित मानला जातो. श्रीगणेशाची पूजा विधीपूर्वक केल्यास संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. याने मनोकामना पूर्ण होते. जाणून घ्या ग्रहांच्या स्थितीमुळे बुधवारी कोणत्या राशींना धनप्राप्ती होऊ शकते.

मिथुन (Gemini)

वडिलांच्या मदतीने पैसा मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. कला किंवा संगीतात रुची वाढू शकते. एखाद्या मित्राचे सहकार्यही मिळू शकते. बौद्धिक कार्यातून पैसा कमावता येईल. कला आणि संगीताची आवड वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा राहील. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. तुम्हाला सुखद परिणाम मिळतील.

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ राशींचे लोक असतात भावनिक स्वभावाचे)

तूळ (Libra)

धार्मिक संगीतात रुची वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.वाहन सुखात वाढ होऊ शकते. कुटुंबासह धार्मिक स्थळी यात्रेला जाऊ शकता. तणावापासून दूर राहा. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. वाचनाची आवड निर्माण होईल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.

(हे ही वाचा: Astrology: १२ जुलैपासून शनिदेव उलट फिरणार, ‘या’ ३ राशींना होऊ शकतो धनलाभ)

कुंभ (Aquarius)

आत्मविश्वास भरून राहील. वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. स्वावलंबी व्हा. राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. वास्तूचा आनंद वाढेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. वादविवादांपासून दूर राहा.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader