Mangal Planet Transit In Scorpio 2023: ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी आपल्या राशीतून परिक्रमण करताना अन्य राशीत प्रवेश करत असतो. यालाच ग्रहांचे गोचर किंवा मराठीत (मार्गीक्रमण) म्हणतात. नोव्हेंबर महिन्यात काही ग्रहांचे महत्त्वपूर्ण गोचर होणार होते. यातीलच एक म्हणजे मंगळ गोचर. मंगळ हा साहस व पराक्रमाचा कारक मानला जातो. असं म्हणतात की, मंगळाला राशी परिवर्तन करण्यासाठी निदान ४५ दिवसांचा कालावधी लागतो. या महिन्यात १६ नोव्हेंबरला मंगळ ग्रहाने वृश्चिक राशीत गोचर केले होते. आज कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तापासून वृश्चिक राशीतून मंगळाचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. तब्बल २२ महिन्यांनी झालेले हे मंगळ गोचर काही राशींना प्रचंड धनसंपत्ती व मान- सन्मान मिळवून देऊ शकते. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यात तुमचा समावेश आहे का? याविषयी सविस्तर जाणून घेऊया..
कार्तिकी एकादशीपासून ‘या’ राशींच्या नशिबाला लागतील चार चांद
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
मंगळ ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश घेतला असला तरी हा कालावधी तूळ राशीसाठी सर्वात जास्त फायदे घेऊन येणार आहे. याचे एक कारण म्हणजे मंगळ आपल्या राशीच्या धन स्थानी गोचर करत आहे यामुळे निश्चितच आपल्याला प्रचंड धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत पहिल्या स्थानी मंगळाचा प्रभाव नसल्याने आपल्याला अडथळे येण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे मंगळाचे केवळ लाभ आपल्या वाटायला येऊ शकतात. ही संधी तुम्हाला पराक्रमी बनवू शकते. एखादा नवीन व्यवसाय सुरु करण्याचा मानस असेल तर वेळीच गुंतवणूक सुरु करा. मंगळाच्या गोचरासह झालेल्या धनलाभामुळे आपल्याला कर्जातून मुक्ती मिळू शकते ज्यामुळे मनावरचा मोठा ताण दूर होईल.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
सिंह रास ही अगोदरच पराक्रमी व साहसी म्हणून ओळखली जाते त्यात मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच ओळख मिळू शकते. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत चौथ्या स्थानी मंगळाचे गोचर प्रभावी असणार आहे. हा कालावधी एखाद्या नव्या खरेदीसाठी लाभदायक ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीचा प्रचंड फायदा होऊ शकतो. धनप्राप्तीच्या बाबत नशीब साथ देऊ शकते. कामातील अडथळे दूर होऊ शकतात. भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारी ही वेळ असेल.
हे ही वाचा << १ जानेवारी २०२४ पासून ‘या’ ४ राशी असतील सर्वात नशीबवान! शनी- गुरु देतील धन व वैभव, सुखाची होईल नांदी
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
ग्रहांचे सेनापती मंगळ जेव्हा वृश्चिक राशीत प्रवेश करून स्थिर झाले तेव्हाच मीन राशीतील मंडळींचा लाभदायक कालावधी सुरु झाला होता. कार्तिकी एकादशीपासून तुमच्या कामाला वेग मिळणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतात ती गोष्ट पूर्णत्वास जाऊ शकते. नोकरदार मंडळींना या कालावधीत प्रमोशन मिळू शकते तर व्यवसायात सक्रिय असणाऱ्या मंडळींना नवनवीन संपर्क जोडता येतील. आरोग्याची काळजी घ्या. मीन राशीला वाणीच्या माध्यमातून मोठा धनलाभ व मानसिक लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)