22 November, Daily Horoscope In Marathi : आज २२ नोव्हेंबर रोजी कार्तिक कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी शुक्रवार आहे. सप्तमी तिथी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ०८ मिनिटांपर्यंत राहील. तर याच दिवशी रात्री ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत ब्रह्मयोग राहील.तसेच शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांपर्यंत आश्लेषा नक्षत्र राहील. ब्रह्मयोग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे कोणताही शांतीपूर्ण कार्य करण्यासाठी हा खूप शुभ दिवस आहे. शुक्रवार चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. त्यामुळे आजच्या या शुभदिनी मेष ते मीन राशीचे भविष्य कसे असेल जाणून घेऊया…

२२ नोव्हेंबर २०२४ पंचांग व राशी भविष्य: कुणाचं नशीब उजळणार? (Horoscope Today, 22 November 2024)

मेष:- तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
23 November Rashi Bhavishya In Marathi
२३ नोव्हेंबर पंचांग: आज कोणाला मिळेल भाग्याची साथ तर कोणाची आर्थिक घडी सुधारणार? वाचा तुमचा शनिवार कसा जाणार
Aries To Pisces 7th November Horoscope In Marathi
७ नोव्हेंबर पंचांग : आज स्वामींच्या कृपेने १२ पैकी कोणत्या राशी होतील धनवान; तुमच्या आयुष्यात येतील का सुखाचे क्षण? वाचा गुरुवारचे राशिभविष्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य

वृषभ:-कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे.

मिथुन:-आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क:- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह:-मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या:-व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.

तूळ:-आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक:-आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

हेही वाचा – Mangal Vakri 2025 : जानेवारी महिन्यात ‘या’ राशींचे नशीब फळफळणार; मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीने मिळणार अमाप संपत्ती अन् सुख

धनू:-जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर:-लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ:-भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन:-स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक लाभाची शक्यता, आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )