22nd August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज २२ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची तृतीया तिथी असणार आहे. तृतीया तिथी आज दुपारी १ वाजून ४७ पर्यंत असेल, त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल. आज धृति योग, त्रिग्रही योग, सुकर्म योग असणार आहे ; धृति योग दुपारी १ वाजून १० पर्यंत राहील. तसेच आज उत्तरा भाद्रपद नक्षत्र रात्री १० वाजून ०६ पर्यंत असणार आहे. तर आज राहुकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असेल. याशिवाय आज श्रावणातील संकष्टी चतुर्थी असणार आहे. तर आज बाप्पाच्या कृपेने मेष ते मीनपैकी कोणाच्या पदरात मेहनतीचे फळ पडणार आहे हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२२ ऑगस्ट पंचाग व राशीभविष्य :

मेष:- आत्मविश्वास बाळगून काम करा. नातेवाईकांशी व्यवहाराने वागा. आज दिनक्रम व्यस्त राहील. मनाचा तोल सांभाळावा. समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

वृषभ:- इतरांकडून स्तुती केली जाईल. सतत काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा. ग्रहमानाची साथ मिळेल. आजचा दिवस शुभ राहील. धनसंचय वाढीस लागेल.

मिथुन:- वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा. दिवस धावपळीत जाईल. मात्र नियोजित काम पूर्ण होईल असे नाही. प्रवास संभवतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

कर्क:- विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. घरातील कामात अडकून पडाल. रचनात्मक कामात आनंद मिळेल. व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल.

सिंह:- आपल्या चांगुलपणाला तडा जाऊ देऊ नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्यावे. कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल.

कन्या:- आळस बाजूला सारावा लागेल. आपल्यातील कला जोपासा. कामाचा अधिक ताण जाणवेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ:- हातातील काम मनापासून करावे. कामातून चांगले समाधान मिळेल. आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक:- आहारातील पथ्य पाळा. अंत:करणापासून समोरच्याला मदत करा. प्रेम संबंधातील ओलावा वाढेल. नातेवाईक मदतीला येतील. जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचा योग.

धनू:- आज आखलेले काम सुरळीत पार पडेल. जास्त काळजी करू नये. स्पर्धा परीक्षेसंदर्भात सकारात्मक वार्ता मिळेल. मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल. समस्येचे निराकरण होईल.

मकर:- उगाचच कोणाची खोडी काढू नका. कामाचा व्याप वाढता राहील. जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका. विस्कळीत कामाची घडी नीट बसवावी.

कुंभ:- फसव्या लोकांपासून सावध रहा. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मित्राची योग्य साथ लाभेल. विरोधक पराभूत होतील.

मीन:- व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. धार्मिक कामातील गोडी वाढेल. कुटुंबासाठी देखील वेळ काढावा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22nd august rashi bhavishya shravan sankashti chaturthi on krishna paksha trutiya tithi get mesh to mean zodiac signs happiness and calmness daily horoscope in marathi asp
Show comments