22nd June Panchang & Rashi Bhavishya: २२ जूनला ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी संपून मग सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी कृष्ण पक्षाचा प्रारंभ होणार आहे. कृष्ण पक्षातील प्रतिपदा आज असेल. २२ जूनला शनिवारी प्रतिपदेच्या दिवशी शनी महाराज काही राशींच्या कुंडलीत उत्तम ठिकाणी प्रभावी असतील. संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत शुक्ल योग्य असणार आहे तर ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र जागृत असेल. आजच्या दिवसही कबीर जयंती सुद्धा साजरी केली जाणार आहे. आज शनिवारी तुमच्या राशीच्या नशिबाचे तारे कसे चमकू शकतात हे पाहूया..
२२ जून पंचांग व राशी भविष्य
मेष:-स्वत:ला आवडत्या कामात गुंतवून घ्यावे. मनातील चुकीचे विचार काढून टाका. कामाचा ताण वाढला तरी फायद्यात राहाल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.
वृषभ:-कामात सुसंगती आल्याने थोडा आराम करू शकाल. कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडेल. प्रिय व्यक्तीची आवड पूर्ण करावी लागेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मिथुन:-आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. नसत्या शंका मनात आणू नका. व्यावसायिक कामात स्पष्टता ठेवावी. वैचारिक गोंधळ घालू नका. हसत-हसत आपले मत मांडावे.
कर्क:-चोरांपासून सावध राहावे. मित्रांशी पैज लावाल. आपला संयम ढळू देऊ नका. बचत करण्यावर अधिक भर द्यावा. कौटुंबिक गरजा ध्यानात घ्या.
सिंह:-चर्चेला अधिक वाव द्यावा. तरुण मित्रांच्यात वावराल. नवीन ओळखी होतील. अनुभवी लोकांचा सल्ला विचारात घ्यावा. व्यापारातून चांगला लाभ संभवतो.
कन्या:-शारीरिक क्षमता तपासून पहावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. जवळचा प्रवास करावा लागेल. कमिशन मधून चांगला लाभ कमवाल. कुटुंबाला पर्याप्त वेळ द्यावा.
तूळ:-घरातील गोष्टींमध्ये अडकून पडाल. काही गोष्टींबाबत आग्रही राहाल. दीर्घकालीन फायद्याचा विचार कराल. नातेवाईकांवर आपली मते लादू नका. मित्रमंडळींशी जुळवून घ्यावे.
वृश्चिक:-सकारात्मक धोरण ठेवावे. कौटुंबिक खर्चाचा अधिक विचार कराल. इतरांना दुखवू नका. ताळमेळ साधत कामे करावी लागतील. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
धनू:-मानसिक स्थैर्य जपावे. आलेल्या अनुभवातून काहीतरी शिकण्यास मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे मत मान्य करावे लागेल. जुन्या कामातून यश मिळेल. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.
मकर:-जुन्या विचारात अडकून पडू नका. मनातील निराशा झटकून टाका. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील बदलात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
हे ही वाचा<< शनी कृपेने उलट फिरणार नशिबाचे तारे; २०२५ पर्यंत या तीन राशींचे अच्छे दिन, ‘या’ रूपात घरी येईल लक्ष्मी
कुंभ:-ध्यानधारणा व योगाचा तुम्हाला फायदा होईल. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. बोलण्यातून इतरांना दुखवू नका. घरात टापटीप ठेवाल.
मीन:-उगाचच लहान सहान गोष्टींवरून चिडू नका. कलात्मक काम तुम्हाला आनंद देईल. नव्या संकल्पना फलद्रुप होतील. घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आवडत्या छंदाला वेळ काढाल.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर