22nd September 2024 Horoscope and Panchang In Marathi : आज २१ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत राहील. आज परीघ योग सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांपर्यंत जुळून येईल, त्यानंतर शिवयोग सुरु होईल. तसेच बुधवारी पहाटे ५ वाजून ३९ पर्यंत आर्द्रा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आजचा दिवस मेष ते मीनसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२२ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- विचार करून मगच बोलावे. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी उगाच वाद घालू नका. भागीदारीत सबुरीने वागावे. भावंडांचे प्रश्न सोडवाल.

वृषभ:- दिवस मनासारखा घालवाल. जास्त विचार करत बसू नका. चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक धनलाभाची शक्यता.

मिथुन:- वैचारिक गुंतागुंत वाढेल. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. जोडीदाराची साथ उत्तम लाभेल. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणावरून चिडू नका.

कर्क:- कामाची दगदग वाढेल. सतत गुंतून राहाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवा. सर्वांना आपलेसे करून घ्याल. क्षुल्लक मतभेदात अडकू नका.

सिंह:- अधिकाराचा वापर करा. तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. भावंडे तुमच्याविषयी तक्रार करू शकतात. स्वत:चा आब राखून वागाल.

कन्या:- बोलताना सारासार विचार करून बोलावे. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करावा. हातात काही नवीन जोखमीची कामे येतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.

तूळ:- राग आवरावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. काही जुने प्रश्न सामोरे येतील. घरगुती ताण आटोक्यात ठेवावा.

वृश्चिक:- राजकारणी धोरण महागात पडू शकते. स्वत:चेच खरे कराल. मनासारखी विश्रांती मिळणार नाही. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.

धनू:- प्रत्येक गोष्टीकडे आनंदी नजरेने पहाल. सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगाल. आवडीचे पदार्थ चाखाल. कामे मनाजोगी पार पडतील. झोपेची तक्रार जाणवेल.

मकर:- चिकाटी सोडून चालणार नाही. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. पैज जिंकता येईल. कामातील बदल जाणून घ्या.

कुंभ:- उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार रहा. जुनी कोर्टाची कामे निघू शकतात. मित्रांच्या सहवासात रमाल. आवडती वस्तु खरेदी कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

मीन:- ईश्वर भक्तीत अधिक वेळ घालवाल. शारीरिक कष्ट अधिक संभवतात. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता. अति अपेक्षा बाळगू नका. प्रवासाचा योग संभवतो.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22nd october rashi bhavishya ani panchang in marathi some zodiac signs get difficulties and son get advantage read asp
Show comments