23 January 2025 Horoscope And Panchang : २३ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपर्यंत राहील. उद्या पहाटे ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत विशाखा नक्षत्र जागृत असेल. गंड योग संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांपर्यंत जुळून येईल. १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यास शुभ फळ मिळते ; असे सांगितले जाते. तर आज गुरुवार १२ राशींना कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

२३ जानेवारी पंचांग व राशिभविष्य :

मेष:- निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

Mangal Pushya Yog 2025
ग्रहांचा सेनापती मंगळ करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश! ‘या’ राशींचे लोक जगतील ऐशो-आरामाचे जीवन; अचानक होईल धनलाभ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
aquarius Yearly Horoscope 2025 in Marathi | kumbha Rashibhavihsya 2025 in Marathi
Aquarius Yearly Horoscope 2025 : कुंभ राशीला नोकरी, व्यवसायात कधी होणार लाभ? आरोग्य ते नातेसंबंध… कसे असेल वर्ष; वाचा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे भविष्य
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025: बुध आणि शुक्र बदलणार राशी! ‘या’ चार राशी ठरतील भाग्यशाली, अचानक होईल धनलाभ
Rashi Bhavishya In Marathi
१० जानेवारी पंचांग: पुत्रदा एकादशीला १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख आणि सौभाग्य? भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार का? वाचा राशिभविष्य
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख

वृषभ:- तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल.

मिथुन:- नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.

कर्क:- हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह:- सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.

कन्या:- आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.

तूळ:- योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.

वृश्चिक:- लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

धनू:- सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.

मकर:- मन:शांति लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

कुंभ:- नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन:- बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader