23rd May Panchang & Rashi Bhavishya: २३ मे २०२४ ला वैशाख शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेला तिथी संध्याकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत कायम असणार आहे. २३ मे ला दुपारी १२ वाजून १३ मिनिटांपर्यंत परीघ योग असणार आहे. तसेच गुरुवारी सकाळी ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत विशाखा नक्षत्र असणार आहे त्यानंतर अनुराधा नक्षत्र जागृत होईल. २३ मे चे दिनविशेष म्हणजे आज बुद्ध पौर्णिमा व छिन्नमस्ता जयंती आहे. आजच्या दिवशी तुमच्या राशीच्या कुंडलीत काय लिहिलंय हे पाहूया..

२३ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-परिस्थितीला नावे ठेऊ नका. आपल्या मानसिक अस्वास्थ्याचे कारण शोधा. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा. मित्रांशी मतभेद संभवतात.

Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
From November 16 the fortunes of these zodiac signs
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे भाग्य चमकू शकते, ग्रहांचा राजा सूर्याचा नकारात्मक प्रभाव संपणार
Saturn margi
१५ नोव्हेंबरपासून ‘या’ तीन राशींनी राहावे सतर्क, शनिच्या चालीमुळे करावा लागू शकतो अडचणींचा सामना
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
people born on these date can become a good leader
‘या’ तारखेला जन्मलेले लोक बनतात चांगले राजकीय नेते, राजकारणात कमवतात नाव
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
shukra gochar 2024 venus transit makar
२ डिसेंबरपासून ‘या’ राशींवर होईल शुक्राची कृपादृष्टी; मिळणार बक्कळ पैसा, नोकरी-व्यवसायात प्रगती अन् संधी

वृषभ:-व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवाल. तुमचा तर्क अचूक लागेल. आपले मत गोडीने समजावून सांगाल. कामाचा व्याप वाढेल. अती श्रमाचा ताण राहील.

मिथुन:-हसतहसत कामे साधून घ्याल. तत्परतेने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा. आपले विचार मोजक्या शब्दात मांडा. झोपेची तक्रार जाणवेल.

कर्क:-जोडीदाराची उत्तम साथ राहील. मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. फसवणुकीपासून सावध राहावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

सिंह:-कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. कामात हाताखालील सहकार्‍यांची मदत होईल. लहान मुलांत रमून जाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

कन्या:-इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल. तब्येतीत सुधारणा दिसून येईल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. मनाची चंचलता जाणवेल. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा.

तूळ:-वादाच्या दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात. एखाद्या इच्छेला मुरड घालावी लागू शकते. पत्नीचा निश्चय मान्य करावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. क्षुल्लक कारणांवरून चिडू नये.

वृश्चिक:-जोडीदाराच्या मताला मान्यता द्याल. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. घरात प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न कराल. कामात प्रगतीला वाव आहे. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

धनू:-कामे यथायोग्य पार पडतील. खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा. टीकेला सामोरे जावे लागू शकते. हट्ट सोडावा लागू शकतो. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

मकर:-कामातील चिकाटी वाढवावी. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. चुकून बोललेला शब्द लागू शकतो. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. इतरांना आनंदाने मदत कराल.

कुंभ:-आपले उद्दीष्ट सध्या करण्याचा प्रयत्न करावा. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. साहसी निर्णय विचारांती घ्यावेत.

हे ही वाचा<< शनी खजिन्याचं कुलूप बुद्ध पौर्णिमेला उघडणार; ‘या’ ४ राशींना मिळणार मोठा वाटा, श्रीमंतीसह ‘हे’ लाभ करतील भरभराट

मीन:-सामाजिक वादात अडकू नका. वडीलधार्‍यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढीस लागेल. इतरांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर