23rd August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज २३ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी सकाळी १० वाजून ३९ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर पंचमी तिथी सुरु होईल. शुक्रवारी अमृत सिद्धी योग संध्याकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत तर रेवती नक्षत्र संध्याकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. आजचा राहू काळ सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ पर्यंत असेल. तर अमृत सिद्धी योग कोणत्या राशीसाठी फलदायी ठरेल, तुमचा शुक्रवार कसा जाईल यासाठी आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

२३ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- अति विचार करू नका. जुने आर्थिक मुद्दे मार्गी लागतील. स्थावर, शेती विषयक प्रश्न मार्गी लागतील. संध्याकाळ नंतर दिवस चांगला जाईल. कौटुंबिक सहयोग उत्तम लाभेल.

venus transit in kanya
२६ दिवस शुक्रदेव देणार पैसाच पैसा! ४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? राशी परिवर्तन होताच दारी नांदणार लक्ष्मी
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Transit of saturn 85 days Saturn will give money
८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
shani meen gochar 2025
शनी करणार मालामाल! २०२७ पर्यंत ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
24th August 2024 Rashi Bhavishya Shravani Shanivar
श्रावणी शनिवार, २४ ऑगस्ट पंचाग: महादेव आज मेष, तूळसह ‘या’ राशींना सुख-समृद्धी देणार; अश्विनी नक्षत्रात सुवर्ण लाभ होणार; वाचा तुमचं भविष्य
September horoscope 2024
बक्कळ पैसा! सप्टेंबर महिन्यात राशी परिवर्तनामुळे ‘या’ सहा राशींचे चमकणार भाग्य
These four zodic sign dear of Shri Krishna
आकस्मिक धनलाभ होणार; श्रीकृष्णाच्या ‘या’ चार प्रिय राशींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्याचे सुख
Saturn will enter Pisces in 2025
२०२५ मध्ये शनि करणार मीन राशीत प्रवेश, या ३ राशींचे नशीब पलटणार, प्रत्येक कामात मिळणार यश

वृषभ:- मुलांच्या अपेक्षा पूर्ण होतील. उधारी वसूल होईल. नवीन योजनेकडे लक्ष लागून राहील. स्थान बदलाची योजना यशस्वी होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मिथुन:- आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवा. मित्रांना मदत कराल. हातातील कलेला वाव द्यावा. आपल्या आवडीची कामे करायला मिळतील. व्यवसायासंबंधी काही नवीन योजना स्फुरतील.

कर्क:- जुनी येणी वसूल होतील. बोलण्यातून लोकांना दुखवू नका. कामात मनापासून प्रयत्न करा. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. मित्रांचे उस्फूर्त सहकार्य लाभेल.

सिंह:- बोलण्यातून लोकांचा विश्वास संपादन कराल. कौटुंबिक कामे योग्य पद्धतीने कराल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. वरिष्ठ अधिकारी समस्या निर्माण करू शकतात.

कन्या:- मित्रांवर पैसे खर्च कराल. इतरांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. व्यावहारिक सावधानता बाळगावी. घरात शुभ कार्याविषयी चर्चा कराल. दिवस उत्तम जाईल.

तूळ:- बोलण्यात कडवटपणा आणू नका. कामात स्त्रियांची मदत मिळेल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. कामात काहीसे परिवर्तन शक्य. कामाच्या ठिकाणी असणारे वाद संपुष्टात येतील.

वृश्चिक:- धार्मिक कामासाठी पैसे खर्च होतील. लोक आपला सल्ला मानतील. आजचा दिवस चांगला जाईल. स्पर्धेला सक्षमपणे सामोरे जा. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे.

धनू:- अति बोलू नका. घरगुती कामात संपूर्ण दिवस जाईल. दैनंदिन कामातील बदल लाभदायक ठरेल. हातातील संधीचे सोने करावे. रागावर नियंत्रण ठेवावे.

मकर:- जुनी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. दिवस सामान्य राहील. गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुलांसंदर्भात काही निर्णय घ्याल. नियमांचे पालन करा.

कुंभ:- इच्छित प्रश्नाचे उत्तर मिळेल. मोसमी आजारांपासून काळजी घ्यावी. कुटुंबासमवेत वेळ घालवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल.

मीन:- घरात कलहाचे प्रसंग येऊ देऊ नका. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. प्रसंगांना संयमाने सामोरे जावे. अनाठायी खर्च संभवतात.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर