23rd September Rashi Bhavishya & Panchang : आज २३ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी सोमवारी दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत राहील.तसेच रात्री ३ वाजून १० मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. तसेच रात्री १० वाजून ०८ पर्यंत रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. आज षष्ठी तिथीचे श्राद्ध केले जाईल. तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात १२ राशींची आनंदात जाणार की दुःखात हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

२३ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- अति उत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.

Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Daily Horoscope for Aries To Pisces
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Today is the shortest day and longest night of the year
आज वर्षातील सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या नेमकं असं का?
Yearly Horoscope 2025 in Marathi
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य
Venus jupiter combination Navpancham Rajayoga
आजपासून नुसती चांदी; नवपंचम राजयोग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रसिद्धी आणि प्रत्येक कामात यश
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी

वृषभ:- वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मिथुन:- आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा.

कर्क:- लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.

सिंह:- कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.

कन्या:- जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

तूळ:- दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका.

वृश्चिक:- शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.

धनू:- विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

मकर:- कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका.

कुंभ:- काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका. आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.

मीन:- व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader