Surya Gochar In Meen Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य देव धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतात तेव्हा खरमास सुरु होतो. धनु व मीन राशीचा स्वामी गुरु आहे. सूर्य व गुरु या ग्रहांमध्ये शत्रुत्वाचे नाते आहे त्यामुळे अनेकदा त्यांची युती ही शुभ मानली जात नाही. खरमास चालू असताना धार्मिक मान्यतांनुसार शुभ कार्य सुद्धा टाळले जाते. उद्या म्हणजेच १४ मार्चला सूर्याचे मीन राशीत गोचर होणार आहे आणि पुढील १ महिना म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत सूर्यदेव मीन राशीत कायम असतील. यानुसार पुढील एक महिना खरमां असणार आहे. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी राहू ग्रह सुद्धा मीन राशीतच उपस्थित असणार आहे. सूर्य व राहूची युती झाल्याने ग्रहण योग निर्माण होत आहे. या स्थितीत राहूच्या मध्यस्थीने खरमासात सुद्धा ५ अशा राशीत आहेत ज्यांच्यासाठी सोन्याहून पिवळा असा फायदेशीर कालावधी सुरु होणार आहे. धन- शांती- समृद्धी व सुदृढता मिळवून देणारा असा हा योग नेमक्या कोणत्या नशीबवान राशीच्या कुंडलीत असणार आहे हे पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. राहू व गुरुचे पाठबळ मिळाल्याने हितशत्रूंवर मात करता येईल. आर्थिक मिळकतीच्या कक्षा रुंदावू शकतात. जीवनात भौतिक सुख अनुभवता येऊ शकते. महत्त्वाची कामे पहिल्या १५ दिवसात पार पाडावीत. प्रवासाचा योग आहे.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. कुटुंबासह एखादी सहल होऊ शकते. या कालावधीत वैवाहिक जीवनात आनंद वाढू शकतो. अडकून पडलेली कामे पूर्ण झाल्याने धनलाभाची सुद्धा संधी निर्माण होऊ शकते.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

या कालावधीत आपल्याला धन, समृद्धी, प्रतिष्ठा, सुख शांतीचा अनुभव येऊ शकतो. आर्थिक लाभाचे स्रोत वाढू शकतात ज्यामुळे आपल्या तिजोरीत धनलक्ष्मीचा वास राहू शकतो. आपण लोकांच्या गर्दीत ठसठशीत उठून दिसू शकता व आकर्षणाचे केंद्र बनू शकता. वादाचे मुद्दे सोडवता येतील.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

आर्थिक फायदे वाढू शकतात. कर्जातून मुक्ती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी मोठे यश आपल्या वाट्याला येऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये चालू असणारा तणावाचा अवधी संपून जाईल. घरात आनंद वाढीस लागेल. संतती सुखाची सुद्धा चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाचा<< ७ दिवसांनी शनीचा उदय होणार! झोपलेलं नशीब होईल जागं, मेष, कुंभसह ‘या’ ५ राशींना अभूतपूर्व श्रीमंतीचे योग

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

सूर्य गोचर झाल्याने मकर राशीच्या मंडळींच्या आयुष्यात नवी सुरुवात करण्याची संधी चालून येऊ शकते. व्यवसायात आपल्याला लाभ होऊ शकतो. धर्म- कर्मातील आवड वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांमुळे मनस्ताप वाढू शकतो, जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 hours later surya gochar in meen rashi kharmaas begins till 14th april 5 rashi to be rich powerful destiny shine like sun astrology svs