24th June Panchang & Rashi Bhavishya: २४ जून २०२४ ला ज्येष्ठ कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. आज रात्री उशिरा १ वाजून २४ मिनिटांपर्यंत तृतीय तिथी कायम राहील. आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी अत्यंत शुभ असा इंद्र योग सुद्धा निर्माण झाला आहे. सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपर्यंत इंद्र योग कायम असे व त्यानंतर वैधृती योग सुरु होईल. सोमवारी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांपर्यंत उत्तराषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशींपैकी कुणाला कसा लाभ होणे अपेक्षित आहे हे पाहूया, वाचा ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांनी वर्तवलेलं तुमच्या राशीचं भविष्य..
२४ जून पंचांग आणि राशी भविष्य
मेष:-धार्मिक कामात मदत कराल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. घरगुती कामानिमित्त प्रवास घडेल. सामुदायिक गोष्टींमध्ये अडकू नका. सहकार्यांशी सलोख्याने वागावे.
वृषभ:-किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ मिळवाल. रेस, जुगारापासून दूर राहावे.
मिथुन:-गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका. शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. बौद्धिक हटवादीपणा दाखवाल. आभ्यासू दृष्टीकोन ठेवाल.
कर्क:-कलात्मक आनंद शोधावा. विषयाच्या मुळाशी जाऊन पहावे. तुमच्या विरोधात काही व्यक्ति वागू शकतात. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
सिंह:-लहान मुलांच्यात वावराल. जवळचे मित्र भेटतील. अधिकारी लोकांच्या ओळखी होतील. मनाचा विचार महत्त्वाचा ठरेल.
कन्या:-अपेक्षित ध्येयासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. नातेवाईकांची मदत घेता येईल. थट्टेखोर स्वभावामुळे लोकप्रिय व्हाल. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल.
तूळ:-प्रवासात चोरांपासून सावध राहावे. भावंडांशी गैरसमजाचे प्रसंग येऊ शकतात. चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
वृश्चिक:-पराचा कावळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कौटुंबिक वातावरण कलुषित होऊ शकते. रागाला आवर घालावी लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. संयम बाळगावा लागेल.
धनू:-आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. मनात विचारांचा गुंता वाढवू नका. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. कौटुंबिक वातावरण तप्त राहू शकते. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
मकर:-दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. मनातील संभ्रम टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रमंडळी जमवून वेळ आनंदात घालवा. प्रेमसंबंधाची व्यापकता वाढेल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.
कुंभ:-शारीरिक ऊर्जेची बचत करावी लागेल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता. मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.
हे ही वाचा<< पुढचे सहा महिने देवी लक्ष्मीची कृपा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा
मीन:-तुमच्यातील उत्साह वाढीस लागेल. गोष्टी व्यवस्थित समजून मग वागावे. कौटुंबिक अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. कामाच्या ठिकाणी चोख राहावे लागेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd