24th September Rashi Bhavishya & Panchang : २४ सप्टेंबरला भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत राहील. आज मंगळवारी रात्री १ वाजून २७ मिनिटांपर्यंत व्यतिपात योग राहील. तसेच मृगशिरा नक्षत्र रात्री ९ वाजून ५४ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे.राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच आज कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे आणि यादिवशी कालाष्टमी व्रत केले जातात. कालाष्टमीचा दिवस शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, शिवाच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने शिवभक्तांच्या जीवनातील सर्व दुःख, रोग आणि अडचणी दूर होतात. तर आजचा तुमचा दिवस निवांत असेल की धावपळीचा हे आपण ज्योतिषशास्त्रांकडून जाणून घेऊ या…

२४ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

वुषभ:- दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका.

मिथुन:- वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.

कर्क:- भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

सिंह:- कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील.

कन्या:- आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल.

तूळ:- अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.

वृश्चिक:- काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल.

धनू:- हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर:- मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:- घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.

मीन:- सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24th september rashi bhavishya in marathi kalbhairav blessed you with power and money read zodic signs horoscope in marathi asp
Show comments