25th January Marathi Horoscope: २५ जानेवारी २०२४ च्या दिवशी सुद्धा पौर्णिमा तिथी कायम असणार आहे. पुनर्वसु नक्षत्र कायम असणार असून या दिवशी काही राशींना अपेक्षित लाभ मिळणार आहेत तर काहींचा नातेवाईकांशी असलेला संबंध दृढ होणार आहे. नक्की कोणाला शांत राहावे लागेल आणि कोणाला चुणूक दाखवता येईल हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष:-मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. फार काळजी करत राहू नका. प्रवासात काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची मदत होईल.

वृषभ:-उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील. स्त्रियांशी मैत्री वाढेल. आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल.

मिथुन:-कलेतून नावलौकिक वाढेल. कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण लाभेल. घरातील साफसफाई काढाल. नीटनेटकेपणाकडे अधिक लक्ष द्याल.

कर्क:-काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. अपयशाने खचून जाऊ नये. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. अतिविचार करू नका.

सिंह:-जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. तिरसटपणे वागू नये. बौद्धिक चुणूक दाखवता येईल. व्यापारी वर्गाला नवीन आशादायी वातावरण लाभेल. नवीन लोक संपर्कात येतील.

कन्या:-कफविकार बळावू शकतात. कामाच्या ठिकाणी समाधान शोधाल. वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे.

तूळ:-तुमची इच्छाशक्ति वाढीस लागेल. साहसाने कामे हाती घ्याल. लिखाणाला बळ मिळेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुमच्यातील सज्जनता दिसून येईल.

वृश्चिक:-सांपत्तिक स्थिती सुधारेल. खर्च वाढू शकतो. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

धनू:-प्रचंड आशावादी दृष्टिकोन ठेवाल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. स्वत:च मान राखण्याचा प्रयत्न कराल. दिलदारपणे वागाल.

मकर:-सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. पारमार्थिक उन्नती साधता येईल. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. सामाजिक सेवेत हातभार लावावा.

हे ही वाचा<< ९० अंशात गुरुदेवाचे युवा अवस्थेत भ्रमण, धनलाभासह ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी, होईल भाग्योदय

कुंभ:-मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे. काटकसर करण्याकडे कल राहील. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवाल. आवडी-निवडीवर भर द्याल.

मीन:-आवडत्या गोष्टी कराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. स्व‍च्छंदीपणे वागाल.

  • ज्योतिषी विद्याधर करंदीकर
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25th january marathi horoscope pornima tithi nakshtra makes relations stronger these rashi to earn money todays marathi horoscope svs