Today Horoscope in Marathi : २७ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी दुपारी २ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. धृति योग रात्री १० वाजून ३७ मिनिटांपर्यंत राहील. तसेच विशाखा नक्षत्र रात्री ८ वाजून २९ मिनिटांपर्यंत असणार आहे. याचबरोबर राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर शुक्रवारी लक्ष्मी कृपेने कोणाचा दिवस अगदी आनंदात जाईल हे आपण जाणून घेऊया…

२७ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- मनातील जुनी इच्छा पूर्ण कराल. महिला मनाजोगी खरेदी करतील. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. सामाजिक स्तरावर मान मिळेल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

वृषभ:- कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना आमलात आणाल. सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल.

मिथुन:- आजचा दिवस मनाजोगा जाईल. आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल. दानधर्म कराल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.

कर्क:- गूढ गोष्टी जाणून घ्याल. मानसिक चंचलता जाणवेल. भावनेला आवर घालावी लागेल. अति विचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता.

सिंह:- काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील कडवटपणा दूर होईल. काही नवीन मार्ग सापडतील. जनसंपर्कात वाढ होईल.

कन्या:- खोटी स्तुति करणार्‍यांपासून सावध राहावे. आपले निर्णय आपणच घ्यावेत. इतरांवर फार विसंबून राहू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ:- आनंदाची अनुभूति मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वातावरण सकारात्मक राहील.

वृश्चिक:- कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. प्रवास मजेत पार पडेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

धनू:- जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील. भावंडांशी संबंध सुधारतील. शेजार्‍यांना मदत कराल.

मकर:- बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.

कुंभ:- मानसिक अस्थिरता दूर होईल. मनाला येईल तसे वागाल. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

मीन:- अति विचारात वेळ वाया घालवू नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत . आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader