27th October 2024, Horoscope Today: आज २७ ऑक्टोबर ही कार्तिक कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आणि रविवार आहे. एकादशी तिथी रविवारी दिवसभर आणि रात्री सोमवारी सकाळी ७.५१ पर्यंत राहील. २७ ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस आणि रात्रभर ब्रह्मयोग राहील. मेघा नक्षत्र सोमवारी दुपारी १२.२४ पर्यंत राहील, त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दिसेल. आज चंद्र रात्रंदिवस सिंह राशीत भ्रमण करेल. रविवारी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सूर्योदय होईल आणि सूर्यास्त सायंकाळी ५ वाजून ३९ मिनिटांनी होईल. पण आजचा सुट्टीचा रविवार कोणत्या राशींसाठी ठरेल आनंदी आणि कोणत्या राशींसाठी कठीण हे आपण जाणून घेऊ…

२६ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (Zodiac Signs Daily Horoscope) :

मेष:- महत्त्वाकांक्षेच्या जोरावर दिवस चांगला जाईल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. अधिकारात वाढ होण्याची शक्यता. हातातील कामात यश मिळेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
28th October Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर : रमा एकादशीला कोणत्या राशीच्या जीवनात येणार सुख, समृद्धी, प्रेम; वाचा तुमचा सोमवार कसा असेल?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

वृषभ:-कामाच्या ठिकाणी मतभेदाची शक्यता. कौशल्याने विजय मिळवाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवा. कठोरपणे वागू नका. ज्ञानात भर पडेल.

मिथुन:-सरकारी कामे वेळ वाया घालवू शकतात. व्यवसायिकांना नाविण्याची जाणीव होईल. नातेवाईकांसोबत पैशाचे व्यवहार टाळा. जास्त धावपळीमुळे थकवा जाणवेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

कर्क:-व्यवसायात भागीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कामात रस घ्याल. नोकरदारांची प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी अधिक श्रम घ्यावे लागतील. रागामुळे तुमची प्रतिमा बिघडू शकते.

सिंह:-दिवस संमिश्र फलदायी राहील. सामाजिक मान वाढेल. पदोन्नती साठी प्रयत्न करत रहा. जमिनीसंबंधी व्यवहारात काटेकोर लक्ष द्या. आईशी मतभेद होण्याची शक्यता.

हेही वाचा – दिवाळीपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब, १२ वर्षांनंतर गुरुच्या वक्रीमुळे मिळणार अपार पैसा अन् यश

कन्या:-दिवसाची सुरुवात उत्साहात होईल. काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात रूजेल. नोकरदारांच्या जबाबदार्‍या वाढतील. व्यवसायात भागभांडवळापासून दूर राहावे. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील.

तूळ:-सांसारिक सुखात वाढ होईल. तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यावसायिक प्रयत्नांना यश येईल. प्रतिष्ठा वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

वृश्चिक:-दिवस परोपकारात घालवाल. इतरांना मदत केल्याचे समाधान मिळवाल. सहकारिवर्ग तुमच्यावर नाराज होऊ शकतो. व्यावसायिक बजेटची चिंता सतावेल. देव दर्शनाचा लाभ उठवाल.

धनू:-मित्रांची मतभेद होऊ शकतात. संयमी वागणे ठेवावे. सौम्य वागण्याने वातावरणातील ताण दूर करता येईल. महिला नवीन खरेदी करतील. मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल.

मकर:-अचानक धनलाभाची शक्यता. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. महत्त्वाचे काम करताना ताण येण्याची शक्यता. मैत्रीत फार सहभाग दर्शवू नका. नोकरदारांनी उत्पन्नाचा मेल घालावा.

कुंभ:-मुलांच्या यशाचा आनंद घ्याल. हातात मोठी रक्कम आल्याने समाधान मिळेल. तुमची प्रगती स्पष्टपणे दिसून येईल. जोडीदाराकडून भेट मिळेल. इतरांना प्रभावित करण्यात वेळ घालवाल.

मीन:-प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. कौटुंबिक वाद संयमाने सोडवा. कार्यालयीन कामात प्रतिभा उंचावेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. भागीदारी फायदेशीर ठरेल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader