27th August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज २७ ऑगस्ट २०२४ रोजी ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची नववी तिथी आहे. नवमी तिथी रात्री २ वाजून ३४ पर्यंत राहील. आज हर्ष योग रात्री ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. तर रोहिणी नक्षत्र दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत राहील. राहू काळ दुपारी ३ वाजून सुरु होईल ते संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच उद्या चौथा श्रावणी मंगळवार देखील असणार आहेत. तसेच उद्या महाराष्ट्रात दहीहंडी हा उत्सव देखील साजरा केला जाणार आहे. १२ राशींपैकी कोणाचा दिवस हसत खेळत जाईल आणि कोणाचा आजचा दिवस मेहनत-परिश्रमात जाईल हे आपण जाणून घेऊ या…
२७ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :
मेष:- समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध रहा. काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात. आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा. या मार्गावर काही अडचणी येतील. मेहनत व परिश्रम कायम ठेवा.
वृषभ:- घरातील कामात बराच वेळ अडकून पडाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. दिवस आनंदात घालवावा. मुलांच्या भविष्याची चिंता वाटेल. काही वेळ स्वत:साठी ठेवावा.
मिथुन:- आपली मन:स्थिती सुधारेल. चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा. आज कोणालाही उधारी देऊ नका.
कर्क:- आपल्या कडून उत्तम सहकार्याची अपेक्षा राहील. व्यापारी वर्गाने गाफिल राहू नये. उत्तम संधी ओळखा. काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे.
सिंह:- स्वत:चे काम स्वत:च करा. कोर्टाच्या कामात दिवस जाईल. अथक श्रमाचा थकवा जाणवेल. काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता. गरजेची कागदपत्रे जपून ठेवा.
कन्या:- आपली इतरांवर चांगली छाप पाडाल. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मात्र वादापासून दूर राहावे. योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा. आपली पत सांभाळून वागा.
तूळ:- आहारातील पथ्ये पाळा. इतरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. काही समस्या सामोरी येऊ शकतात. घरात किरकोळ कुरबुरीचे वातावरण राहील. नातेवाईकांशी सलोखा ठेवा.
वृश्चिक:- उगाच डोक्यात राख घालू नका. कामे धिम्या गतीने पार पडतील. कमी बोलून कृतीवर भर द्यावा, याची सकारात्मक फळे दिसतील. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावाल.
धनू:- आपल्या मतानुसार सर्व गोष्टी होतील असे नाही. मनातील चीड व्यक्त करताना सबुरी बाळगा. एखादे काम मधेच सोडू नका. स्वकर्मावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी गाफिल राहू नका.
मकर:- जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अधिकार्यांशी मतभेद टाळा. क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात. इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. आपल्याच कामाशी संलग्न रहा.
कुंभ:- इतरांशी मोकळेपणाने संवाद साधावा. जुन्या मित्रांशी संपर्क साधावा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. नियोजित कामे पार पडतील. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
मीन:- आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासात सतर्क रहा. दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. तुमचा प्रभाव कायम राहील.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर