27th June Panchang & Rashi Bhavishya: आज २७ मे २०२४ (गुरुवार) रोजी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे.आजच्या दिवशी शततारका नक्षत्र जागृत असून आजचा राहुकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजेपर्यंत असेल. पंचांगानुसार आजच्या दिवशी सौभाग्य योग, रवियोग, आयुष्मान योग असणार आहे. आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या व्यक्तींना कसा जाईल हे जाणून घेऊ या…

२७ जून पंचांग व राशी भविष्य :

Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Yearly Horoscope 2025 in Marathi
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य
Surya Gochar 2024 in Sagittarius horoscope news today
सूर्य गोचरमुळे ‘या’ तीन राशींना पावलोपावली मिळेल नशिबाची साथ! प्रचंड पैसा, पद व प्रतिष्ठेसह मिळेल आनंदाची बातमी
Shani Gochar 2024
पुढील १०३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्ती आणि प्रत्येक कामात यश
Gajkesri rajyog 2025 guru Chandra Gochar 2025
GajKesri Rajyog 2025 : नवीन वर्षात गजकेसरी राजयोगाने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? गुरु-चंद्र संयोगाने मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
Shukra Gochar 2024 :
Shukra Gochar 2024 : २८ डिसेंबर पासून या राशींना मिळणार पैसाच पैसा, पालटणार ‘या’ पाच राशींच्या लोकांचे नशीब; होणार दुप्पट नफा

मेष:- कामात एकसूत्रता ठेवावी. घरात काही बदल करून पहावेत. सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. अधिक चिकाटीने कामे करावीत.

वृषभ:- जुन्या विचारात अडकून राहू नका. वडीलांची नाराजी दूर करावी लागेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा लागेल. न्यायी वृत्तीने वागाल. कर्मठ विचार दर्शवू नका.

मिथुन:- पारंपरिक कामात यश येईल. वडिलोपार्जित कामे धनदायक ठरतील. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. मोहात अडकू नका. स्पष्ट विचार नोंदवा.

कर्क:- आधुनिक गोष्टी जाणून घ्याव्यात. हट्टीपणे विचार कराल. स्वत:च्या इच्छेपुढे इतर गोष्टी दुय्यम वाटतील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

सिंह:- सहकारी लोकांची चांगली साथ मिळेल. कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात. कामानिमित्त प्रवास घडेल. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.

कन्या:- व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल. राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका. चिकाटीने कामे कराल. चटकन निराश होणे टाळावे.

तूळ:- गृहसौख्याला प्राधान्य द्यावे. मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील. व्यावसायिक गुंतवणूक करावी लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक:- खोलवर विचार करावा लागू शकतो. काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. भावंडांची समजूत काढावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्वकर्तुत्वावर अधिक भर द्याल.

धनू:- चिकाटीने कामे करून दाखवाल. विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. धार्मिक कामात मदत करावी.

मकर:- मनातील निराशा झटकून टाकावी. उगाचच दडपण घेऊन राहू नका. नवीन गोष्टी समजून घ्याव्यात. आपली वैचारिकता बदलून पहावी. जोडीदारापाशी मन मोकळे करून पहावे.

कुंभ:- काही कामे रेंगाळून पडू शकतात. चिकाटी सोडून चालणार नाही. मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत. अनावश्यक खर्च टाळावा. मागचा-पुढचा नीट विचार करावा.

मीन:- थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader