Mesh To Meen Horoscope : २८ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. चतुर्दशी तिथी ७ वाजून ५६ मिनिटांपर्यंत राहील. आज शुक्ल योग जुळून येईल. पूर्व भाद्रपद नक्षत्र १० वाजून ०९ मिनिटांनी जागृत असणार आहे. आज राहू काळ १० वाजता सुरु होईल ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आज तुमच्या आयुष्यात नवे काय घडणार हे आपण जाणून घेऊया…
२८ मार्च पंचांग व राशिभविष्य (ies To Pisces Horoscope Today) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
एकाच कामात अधिक लक्ष द्यावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनाची द्विधावस्था वाढू शकते. संयम बाळगावा लागेल. आवडत्या गोष्टीत मन रमवा.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
मितभाषी दृष्टीकोनातून वागाल. मनापेक्षा बुद्धीचा अधिक वापर कराल. फार संभ्रमात अडकू नका. सर्वांना आनंद वाटण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या स्वभावाची उत्तम छाप पडेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
घरगुती कामात मन रमवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. कामे उगाचच खोळंबून राहतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
मौजमजेकडे अधिक कल राहील. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. स्त्री सौख्यात वाढ होईल. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. जोडीदाराविषयी मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढू शकतो. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. पैशाचा अपव्यय टाळावा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्यावा.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊ शकतात. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढेल. उगाचच निरूत्साही वाटेल. आळस झटकून टाकावा.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
मानसिक गोंधळ दूर सारावा. फार काळजी करत बसू नका. लेखक वर्गाला चांगला लाभ मिळेल. बौद्धिक डावपेच खेळाल. सूचक स्वप्न पडू शकेल
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
संभाषणाची आवड जोपासाल. घरी नातेवाईक गोळा होतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. नवीन मित्र जोडले जातील. प्रवासात खर्च वाढू शकतो.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
कौटुंबिक गोष्टींचे भान राखावे. लेखक, प्रकाशक यांना चांगला लाभ होईल. लहान प्रवासाचा योग येईल. सर्व बाबी औत्सुक्याने जाणून घ्याल. काही गोष्टींचे मनन करावे.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
प्रकृतीची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च करू नका. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. हातातील कामात अधिक लक्ष घालावे.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
चौकसपणे गोष्टी समजून घ्याल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग कराल. भावना उत्तम प्रकारे मांडाल. घरगुती जबाबदारी वाढेल. कामाचे योग्य नियोजन करावे.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
काहीसा थकवा जाणवेल. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर