28th August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज २८ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी आहे. दशमी तिथी आज दुपारी १ वाजून २१ मिनिटांपर्यंत असणार आहे. बुधवारी वज्र योग आज संध्याकाळी ७ वाजून १३ पर्यंत राहील. तसेच मृगाशिरा नक्षत्र आज दुपारी ३ वाजून ५५ पर्यंत राहील. राहू काळ दुपारी १२ ते दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. मृगाशिरा नक्षत्रात आज कोणत्या राशीचे नशीब चमकणार ? कोणाला मिळणार आनंदवार्ता तर कोणाचा घडणार कामानिमित्त प्रवास हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

२८ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- उत्तम वाचन कराल. जुन्या प्रश्नांची उकल होईल. आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सामाजिक जाणीव कायम ठेवाल.

Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा
7 January Horoscope In Marathi
शाकंभरी नवरात्रोत्सव, ७ जानेवारी पंचांग: १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख, शांती आणि वैभव; तुमच्या मनोकामना पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
4 January Rashi bhavishya
४ जानेवारी पंचांग: सिद्धी योगात ‘या’ राशींची वेगात होतील कामे; चारचौघात कौतुक, कौटुंबिक सौख्य, अचानक धनलाभ; तुमचे नशीब आज तुम्हाला काय देणार?
Due to Budhaditya Rajyoga in January
जानेवारीमध्ये बुधादित्य राजयोगामुळे या ४ राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ! सूर्य अन् बुधची होईल विशेष कृपा

वृषभ:- कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. दिवस खुशीत घालवाल. मित्रांशी वाद घालू नका. घराची सजावट कराल.

मिथुन:- जोडीदाराचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. हस्त कलेचा आनंद घ्याल. एखादी आनंदवार्ता मिळेल.

कर्क:- मनातील इच्छेपुढे इतर गोष्टी गौण मानाल. मनासारखी खरेदी कराल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. नातेवाईक भेटायला येतील. दिवस आनंदात जाईल.

सिंह:- मित्रांकडून अनपेक्षित लाभ होतील. स्वप्नातून जागे व्हा. कामाचा आवाका लक्षात घ्या. थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा. सहकार्‍यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका.

कन्या:- अति श्रमाचा ताण जाणवेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल. घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो.

तूळ:- चांगल्या कामासाठी प्रवास होतील. लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. कामात स्त्रियांची मदत होईल. पोटाची तक्रार लक्षात घ्या.

वृश्चिक:- संसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. अधिकारी वर्गाची गाठ पडेल. काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

धनू:- शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. परोपकाराची भावना जोपासाल.

मकर:- नवीन कामासंदर्भात बोलणी होतील. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चिकाटी कायम ठेवा.

कुंभ:- अति तिखट पदार्थ खाऊ नका. शिस्तीचा अतिरेक करू नका. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. घरातील कामे आवडीने कराल.

मीन:- क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. फार गरज असेल तरच प्रवास करावा. वाहन चालवताना सावधानता बाळगा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची प्रगती होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader