28th July Panchang & Marathi Rashi Bhavishya: २८ जुलै २०२४ ला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी आहे. आजची अष्टमी ही कालाष्टमी म्हणून सुद्धा साजरी केली जाते. रविवारच्या संध्याकाळी ७ वाजून २७ मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी कायम असणार आहे. पंचांगानुसार आज सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत आश्विनी नक्षत्र जागृत असेल तर रात्री ८ वाजून ११ मिनिटांपर्यंत शूल योग असणार आहे. सूर्य आज कर्क राशीत तर चंद्र आज मेष राशीत असणार आहे. आजच्या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत शुभ असा अभिजात मुहूर्त असणार आहे. आज मेष ते मीन राशींपैकी कुणाच्या नशिबात लाभ आहे व कुणाला कष्ट हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊया.

२८ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-आततायीपणा करून चालणार नाही. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपला साहसीपणा ताब्यात ठेवावा.

Shani Gochar 2025
पुढील ४७ दिवस शनी देणार नुसता पैसा; ‘या’ राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार अन् नवी नोकरी मिळणार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेम
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
surya guru gochar 2025 sun jupiter make kendra drishti yog these zodiac sign will be lucky
होळीच्या आधी ‘या’ तीन राशींची होईल चांदी! सूर्य-गुरू निर्माण करणार केंद्र योग, प्रत्येक कामात मिळणार यश
Ratha Saptami 2025
Ratha Saptami 2025: रथ सप्तमीला सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कशी करावी पूजा? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण

वृषभ:-कष्टाचा मोबदला मिळेल. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. अनुकूलतेचा सदुपयोग करावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. तुमच्याबाबतचे गैरसमज दूर होतील.

मिथुन:-अंगीभूत कलेला वेळ द्यावा. स्व-कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. आळस झटकून टाका. आर्थिक मिळकतीत वाढ होईल. हातातील कामे पूर्णत्वास जातील.

कर्क:-प्रलंबित कामे मार्गी लागतील. अति गोड पदार्थ खाणे टाळा. धनसंचय वृद्धिंगत होईल. मित्रांची भेट मन प्रसन्न करून देईल. दिवसाचा पूर्वार्ध मजेत जाईल.

सिंह:-जुनी देणी चुकवून टाका. शक्यतो वरिष्ठांना नाराज करू नका. व्यक्तिमत्वातून व बोलण्यातून चांगली छाप पाडा. नोकरदार वर्गाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता. समोरच्याला आपण होऊन मदत कराल.

कन्या:-बोलण्यातून कर्तृत्व सिद्ध कराल. मानसिक शांततेला अधिक महत्व द्याल. संशोधन वृत्ती डोके वर काढेल. आहारावर नियंत्रण ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल.

तूळ:-घरात शांत राहून सहकार्य करा. स्वप्नामध्ये अडकून पडू नका. पत्नीशी मतभेदाची शक्यता. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. ज्येष्ठांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल.

वृश्चिक:-कोणावरही अवलंबून राहू नका. दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी सर्वार्थाने अनुकूलता लाभेल. विशाल दृष्टिकोन बाळगावा. जुन्या मित्रांची गाठ पडेल.

धनू:-विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. जुने संशय मनातून काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा साधावा. जुगार खेळताना सावधानता बाळगा. कमिशन मधून लाभ होईल.

मकर:-स्पर्धात्मक गोष्टींची आवड निर्माण होईल. जोडीदाराची प्रेमळ सौख्य लाभेल. विरोधकांवर मात करता येईल. घरगुती ताण-तणाव दूर करता येतील. चहाडखोर व्यक्तीकडे दुर्लक्ष करावे.

कुंभ:-कोणावरही अति विश्वास ठेवू नका. कामात संभ्रम होऊ देऊ नका. बाहेरील कामे पुढे ढकलावीत. आहारावर नियंत्रण ठेवावे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

हे ही वाचा<< Shravan Horoscope: ३१ ऑगस्टपर्यंत वृषभ, तूळसहित ‘या’ राशींचं नशीब सोन्यासम चमकणार; १२ राशींना कशी लाभेल शिवकृपा?

मीन:-बोलताना चुकीचा शब्द बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. व्यायामाची आवड पूर्ण कराल. बर्‍याच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader