Venus Planet Transit In Makar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह राशी परिवर्तन करून अन्य राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा थेट प्रभाव हा मानवी जीवनावर दिसून येतो. येत्या काळात २९ डिसेंबरला शुक्र देव आपले मित्र शनिच्या आवडत्या राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषांच्या माहितीनुसार शुक्र व शनि हे एकमेकांना पूरक ग्रह आहेत. परिणामी या ग्रहांच्या युतीने प्रभावित राशींसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो. ज्योतिष अभ्यासकांच्या मते २९ डिसेंबरला होणारे गोचर हे तीन राशींसाठी अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकते. येत्या काळात या तीन राशींच्या कुंडलीत धनलाभ व प्रगतीचे मजबूत योग तयार होत आहेत.
शुक्र ग्रहाचे संक्रमण उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार
(Shukra Transit In Makar) मेष
मेष राशीसाठी शुक्राचे संक्रमण अत्यंत शुभ ठरू शकते. शुक्र ग्रह आपल्या राशीत गोचर करून दहाव्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान नोकरी व व्यवसायाशी संबंधित मानले जाते. या काळात आपल्याला नव्या नोकरीचा प्रस्ताव प्राप्त होण्याची शक्यता आहे किंवा आपण ज्या नोकरीत आहात तिथेच आपल्याला वरचे पद दिले जाऊ शकते. आपल्याला नवीन जबाबदाऱ्यांसह पगारवाढ सुद्धा लाभण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या मंडळींना पितृरूपी व्यक्तीकडून संपत्ती मिळण्याचा योग आहे. तुमच्या पूर्व गुंतवणुकीचे धनरुपी फायदे येत्या काळात लाभू शकतात.
(Shani Rashi Shukra Gochar) धनु
शुक्र ग्रह राशी परिवर्तन करून धनु राशीत दुसऱ्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान धन व वाणीशी संबंधित मानले जाते. या पुढील काळात आपल्याला अडकलेले पैसे परत मिळू शकतील. जर तुम्ही कुणाला उधारीने पैसे दिले असतील तर त्याच्या पुनर्प्राप्तीचा योग आहे. व्यवसायात हवं तसं यश लाभू शकेल. कामाच्या ठिकाणी ज्या सहकार्यांशी तुमचे मतभेद आहेत त्यांच्या माध्यमातूनच तुम्हाला धनलाभ होण्याची संधी आहे. या काळात अनपेक्षितरित्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभू शकतो.
हे ही वाचा << लक्ष्मी कृपेने ‘या’ राशींना अमाप धनलाभाची संधी; २०२२ च्या शेवटी शनि व गुरुने बनवले ‘हे’ २ मोठे राजयोग
(Venus Planet Transit) मीन
शुक गोचराने मीन राशीच्या भाग्यात करिअरच्या प्रगतीचे प्रबळ योग आहेत. शुक्रदेव आपल्या राशीत ११ व्या स्थानी गोचर करून स्थिर होतील. आर्थिक मिळकत व लाभाचे हे स्थान आहे. याकाळात तुमच्या आर्थिक मिळकतीत दुप्पट वाढ होऊ शकते. तुम्हाला धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पना सुचतील यातील बेस्ट आयडीयाज या तज्ज्ञांच्या मदतीने प्रत्यक्ष अंमलात आणा कारण यामुळेच तुम्हाला धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला नातेवाईकांकडून प्रॉपर्टीच्या बाबत शुभ समाचार लाभण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)