29th May Panchang & Marathi Horoscope: २९ मे २०२४ ला वैशाख कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असणार आहे. बुधवारच्या दिवशी दुपारी १ वाजून ३९ मिनिटांपर्यंत षष्ठी व त्यानंतर सप्तमी तिथी असेल. बुधवारी श्रावण नक्षत्र जागृत असणार आहे. रात्री ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत इंद्र योग कायम राहील. श्रावण नक्षत्रात इंद्र योग असल्याने आपला एकूण दिवस शुभ व प्रसन्न होऊ शकतो. सूर्य आज वृषभ राशीत तर चंद्र मकर राशीत स्थित असेल. आजच्या दिवशी विशेष असा अभिजात मुहूर्त नसला तरी संपूर्ण दिवसाची तिथी ही शुभ आहे. यानुसार बुधवारचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जातो हे आपण पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२९ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-दिवस समाधानात जाईल. होकारात होकार मिसळावा लागेल. प्रसंगातील अनुकूलता लक्षात घ्यावी. अचानक समोर आलेल्या कामातून लाभ संभवतो. कामातील दिरंगाई टाळावी.

वृषभ:-प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नियमांना सोडून वागू नका. फसव्या मित्रांपासून सावध राहावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. वडिलोपार्जित कामातून धनप्राप्ती होईल.

मिथुन:-काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागू शकते. हातातील चांगली संधि सोडू नका. नियोजन करून कामे करावीत. प्रवासात भरकटू नका. वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या.

कर्क:-कामाच्या ठिकाणी चिडचिड वाढू शकते. एकमेकांच्या सहकार्याने कामे करावीत. परदेशी कामातून लाभ संभवतो. मोहाला बळी पडू नका. खिशाला कात्री लागणार नाही याची काळजी घ्यावी.

सिंह:-शक्यतो अकारण होणारे गैरसमज टाळावे लागतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कोणत्याही गोष्टीची जास्त चिकित्सा करत बसू नका. प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्या तिजोरीत भर पडेल.

कन्या:-आत्मसंयमन करावे लागेल. अति धाडस करायला जाऊ नये. स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध कामात सफल व्हाल. व्यावसायिक प्रवास सावधानतेने करावेत.

तूळ:-जोडीदाराला अचानक लाभ होईल. जवळच्या लोकांना दुर्लक्षित करू नका. बेफिकिरीने वागून चालणार नाही. कठोर परिश्रमास पर्याय नाही. जवळचा प्रवास घडेल.

वृश्चिक:-दिवसभर कार्यरत राहावे लागेल. भाऊबंदकीत वाद संभवतात. वाहन चालवताना सतर्क रहा. जोडीदाराचा शब्द प्रमाण मानावा लागेल. घरगुती कामात व्यस्त राहाल.

धनू:-आज मनाप्रमाणे वागण्याचे ठरवाल. खेळाडूंनी कसरतीत कसूर करू नये. थोड्याशा यशाने उतू नका. सारासार विचारावर भर द्या. मधुमेहींनी खाण्याची पथ्ये पाळावीत.

मकर:-सध्याच्या परिस्थितीत बिनधास्त वागून चालणार नाही. अध्यापक वर्गावर जबाबदारी वाढू शकते. जोडीदारा सोबतचे वाद वाढू देऊ नका. वात विकार बळावू शकतात. मानसिक स्थैर्य जपावे.

कुंभ:-दूरच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींवर वाद घालू नका. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. नवीन ओळखी वाढवाव्यात.

हे ही वाचा<< जून महिना देणार भरभराट; दोन ग्रह एकत्र करणार राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींची होणार चांदी

मीन:-थोडी आक्रमक भूमिका घ्याल. स्त्री वर्गावरून वादाचा प्रसंग येऊ शकतो. कामात भावंडांची सहकार्य घेता येईल. तांत्रिक बाबींमध्ये बारीक लक्ष घालावे. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 29th may panchang shravan nakshtra indra yog to effect mesh to meen 12 rashi bhavishya in marathi todays astrology who will gain more money svs