Today’s Horoscope in Marathi : मंगळवार ३ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत पर्यंत चालेल. त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. तर पंचांगानुसार आज शूल योग आणि मूळ नक्षत्राचा शुभ संयोग आहे. मूळ नक्षत्र दुपारी ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

याशिवाय ३ डिसेंबरला रंभा तृतीया व्रत आहे.रंभा तृतीयेच्या दिवशी स्त्रिया सोळा श्रृंगार करून व्रत करतात. रंभा व्रत हे स्वर्गातली सर्वात सुंदर अप्सरा रंभा हिच्या नावाने हे व्रत ठेवले जातात. पौराणिक कथेच्यानुसार इच्छित वर मिळण्यासाठी अप्सरा रंभा हिने हे व्रत केले होते. रंभा तृतीया किंवा रंभा तीजच्या दिवशी शिव-पार्वती आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
budhaditya rajyog 2024 | rajyog in horoscope astrology
१७ नोव्हेंबरनंतर ‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोगामुळे करिअरमध्ये प्रगती अन् उत्पन्न होणार दुप्पट!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरेल लाभदायक? बाप्पा करणार का तुमच्या इच्छा पूर्ण; वाचा सोमवारचे राशिभविष्य
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”

३ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.

वृषभ:- नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल.

मिथुन:- व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

कर्क:- आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. मानसिक समाधान लाभेल.

सिंह:- एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज उधार देणे टाळावे.

कन्या:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

तूळ:- अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. परिस्थितीला नवे ठेऊ नका. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक:- मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल.

धनू:- कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात.

मकर:- लहान प्रवास घडेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका.

कुंभ:- कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल.

मीन:- मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर