3rd July Panchang & Rashi Bhavishya Marathi: ३ जुलैला ज्येष्ठ कृष्ण पक्षातील उदया तिथीनुसार द्वादशी व त्रयोदशी तिथी एकत्रच आहे. बुधवारच्या दिवशी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांपर्यंत द्वादशी समाप्त झाल्यावर त्रयोदशी तिथीचा आरंभ होईल. ३ जुलैचा पूर्ण दिवस व रात्र सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. गुरुवारच्या पहाटे ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे. ३ जुलैला बुध प्रदोष व्रत असणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे, चला पाहूया..

३ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळा. दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मानसिक क्षमता वाढीस लागेल.

Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार

वृषभ:-मध्यवर्ती भूमिका स्वीकारताना काळजी घ्या. वैचारिक गुंतागुंत टाळावी. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घराची जुनी कामे निघू शकतात. तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा.

मिथुन:-सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे.

कर्क:-विनाकारण तोंडसुख नको. भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह:-आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा. खाजगी समस्या सामंजस्याने सोडवाल. कामे झपाट्याने पार पाडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. हातातील संधी सोडू नका.

कन्या:-आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. भावनाप्रधान होऊ नका. तुमचे मनोबल वाढीस लागेल. हित शत्रूंवर मात करता येईल.

तूळ:-कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. भागीदाराची बाजू समजून घ्या. मित्राकडे मनमोकळे करावे. सकारात्मक परिवर्तन घडेल.

वृश्चिक:-काही निकष ठरवावे लागतील. शेजार्‍यांना मदत कराल. कामात कुचराई करू नका. गुंतवणूक करताना सावध राहावे. मनात उगाचच शंका निर्माण होईल.

धनू:-गरज समजून कामे हाती घ्या. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक शांतता लाभेल. दिवसभर कामाची ऊर्जा टिकून राहील.

हे ही वाचा<< मेष राशीची साडेसाती नेमकी केव्हा सुरू होणार आहे? सावध राहण्याची गरज; जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगतात…

मकर:-वादाचे मुद्दे समोर आणू नका. भावंडांना समजून घ्यावे लागेल. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. अकल्पित लाभाची शक्यता. वरिष्ठ अधिकार्‍यांची मदत मिळेल.

कुंभ:-अवाजवी खर्च वाढतील. उगाचच सढळ हाताचा वापर करू नका. जुन्या आठवणी दाटून येतील. संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे.

मीन:-मुलांना अभ्यासात मदत कराल. काटकसर करावी लागू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वरिष्ठांशी ताळमेळ साधावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader