30th April Panchang & Rashi Bhavishya: ३० एप्रिलच्या दिवशी चैत्र मासातील कृष्ण पक्ष षष्ठी आहे. ३० एप्रिलचा संपूर्ण दिवस ते रात्री १० वाजून २३ मिनिटांपर्यत साध्य योग कायम असणार आहे. मंगळवारच्या दिवशी पहाटे ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत उत्तराषाढा नक्षत्र जागृत असेल. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी नेमका कसा जाईल हे पाहूया..

३० एप्रिल पंचांग व राशी भविष्य

मेष:-धार्मिक कामात सहभाग घ्याल. मदतीचा हात पुढे कराल. योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

surya gochar 2024 After 364 days Sun will enter Virgo sign
नुसता पैसा! ३६१ दिवसांनंतर सूर्य करणार कन्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
rahu transit in shani nakshatra uttarabhadra
राहू देणार बक्कळ पैसा; शनीच्या नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान
Lottery draw 2030 houses of Mumbai Mandal of MHADA on September 13 was finally postponed Mumbai news
म्हाडाच्या मुंबई मंडळाची १३ सप्टेंबरची सोडत अखेर लांबणीवर; अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ
Rahu Gochar 2024 Rahu's nakshatra transformation
भरपूर पैसा कमावणार; राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Malavya Rajyog
३६५ दिवसांनी मालव्य राजयोग; सप्टेंबरपासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाचे येणार सुखाचे दिवस?
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Shani transit 2024 Next 216 days earn money
पुढचे २१६ दिवस नुसता पैसा; शनीच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय

वृषभ:-वायफळ बडबड टाळावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे. कामातील बादल लक्षात घ्या. कलेचा आस्वाद घ्याल.

मिथुन:-जोडीदारा विषयी गैरसमज टाळावेत. भागीदारीत सतर्क राहावे. तब्येतीची हेळसांड करू नये. आपली संगत तपासून पहावी. एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका.

कर्क:-तरुण लोकांशी मैत्री कराल. दिवस खोडकरपणात घालवाल. सहकार्‍यांवर अवलंबून राहू नका. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल.

सिंह:-वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदाराशी वाद वाढवू नका. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

कन्या:-मनाची द्विधावस्था जाणवेल. घरच्या कामाचा ताण जाणवेल. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे.

तूळ:-जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक ताणाला बळी पडू नका. मुलांचा विरोध समजून घ्यावा.

वृश्चिक:-घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल.

धनू:-आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य वाढेल. क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत.

मकर:-मैत्रीतील आपुलकी वाढेल. फसवणुकीपासून सावध राहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक लाभाचा दिवस.

कुंभ:-डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. धाडसाने कामे हाती घ्याल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. अती घाई बरी नाही.

हे ही वाचा<< सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत

मीन:-जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कर्तव्यात कसूर करू नका. हातून चांगले लिखाण होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर