Surya Gochar In Makar Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव शनीच्या स्वामित्वाच्या मकर राशीतुन आता कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. मंगळवारी म्हणजेच १३ फेब्रुवारी २०२४ ला दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांनी सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे. पुढील ३० दिवस सूर्य कुंभ राशीतच विराजमान असणार आहेत. जेव्हा एखाद्या ग्रहाचे गोचर होत असते तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर कमी- अधिक प्रमाणात होत असतो. त्यामुळे सूर्याची ही बदललेली स्थिती सुद्धा काही राशींच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकते. ज्योतिष अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार एकाच ग्रह गोचरचा १२ पैकी काही राशींवर कधी कधी अत्यंत शुभ परिणाम होत असतो तर कधी कधी काही राशींना यामुळे प्रचंड कष्ट सहन करावे लागत असतात. सूर्य गोचरामुळे सुद्धा अशीच काहीशी स्थिती उद्भवणार आहे. सूर्याने शनीच्या राशीत प्रवेश घेतल्याने तीन राशी प्रचंड फायद्यात राहणार आहेत, तर दोन राशींना थोडे कष्ट उचलावे लागणार आहेत. या दोन्ही गटातील राशी कोणत्या हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्य देव शनीच्या राशीत राहून ‘या’ मंडळींना देणार आशीर्वाद

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मिथुन राशीसाठी सूर्याची स्थिती सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते. या कालावधीत आपल्याला परदेश प्रवासाचे योग आहेत. कुटुंबासह वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. संभाषणातून आर्थिक कक्षा रुंदावण्याची चिन्हे आहेत. उधार दिलेले पैसे परत मिळतील. प्रेमसंबंध फुलून येतील.

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीला सुद्धा शनीच्या राशीतील सूर्याचे स्थान अनुकूल सिद्ध होऊ शकते. समाजात आपला मान- सन्मान वाढीस लागू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आपले कौतुक होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. कर्जातून मुक्ती मिळू शकते.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीला सुद्धा शनीच्या राशीतील सूर्याचे स्थान लाभदायक ठरू शकते. या कालावधीत तुमच्या मानसिकतेत बदल घडवून आणणाऱ्या घटना घडू शकतात. तुम्हाला सतत सकारात्मक वाटू शकते. धार्मिक कामांची गोडी वाढेल. आपल्या मुलांबरोर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, सातत्य राखावे लागेल.

सूर्याचे स्थान ‘या’ राशींसाठी ठरेल धोक्याचे

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

आरोग्याबाबत तक्रारी वाढू शकतात, पोटाचे व डोळ्यांचे आरोग्य जपावे लागली. शनीच्या शक्तीत सूर्याची जोड लाभल्याने काही प्रमाणात कष्ट द्विगुणित होऊ शकतात. चलबिचल जाणवेल. तुम्हाला मेहनतीला पर्याय शोधून चालणार नाही. धनहानी टाळण्यासाठी गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगा.

हे ही वाचा<< १०० वर्षांनी तिलकुंद चतुर्थीला चतुर्ग्रही योग; आजपासून ‘या’ राशींना अचानक लाभेल गणेश व लक्ष्मीकृपा, व्हाल धनाढ्य

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

आर्थिक स्थितीमध्ये चढ उतार होऊ शकतो. आपल्याकडे प्रचंड पैसे येऊ शकतात पण तितकेच खर्च समोर उभे ठाकतील ज्यामुळे तुम्हाला हौस मौज करण्याची संधी कमी मिळू शकते. इतरांचे मन विनाकारण दुखावू नका. वागण्या- बोलण्यावर लक्ष द्या. प्रेमाच्या नात्यांमध्ये वाद संभवतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 days shani surya to made massive changes in three rashi will earn more money but these two rashi danger bells astrology svs
Show comments