Hindu Nav Varsh Three Rajyog Rashi Impact: मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा ९ एप्रिल २०२४ ला साजरा केला जाणार आहे. यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके १९४६ शोभन नाम संवत्सर प्रारंभ होत आहे. या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे. गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शश राजयोग, अमृत सिद्धी योग व सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. हा योगायोग तब्बल ३० वर्षांनी जुळून आला आहे. यातील शश योग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा बरसणार आहे. शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळ सुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो. यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते, त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुढीपाडव्यापासून ‘या’ ५ राशींचे गोड दिवस होतील सुरु

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष धनु राशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत. हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता. पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे.बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते. पगार ठरवताना वाणीत माधुर्य असायला हवे.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

तीन पैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्य स्थानी तयार होत आहेत. यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते. तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो. जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते. हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुम्हाला कर्जमुक्त होता येईल. मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते. एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते.

हे ही वाचा<< २४ तासांनी सुरु होणार खरमास; १४ एप्रिलपर्यंत ‘या’ ५ राशी जगतील राजाचं आयुष्य, धनलाभासह मिळेल सूर्याची शक्ती

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत ११ व्या स्थानी गोचर करत आहेत तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभ स्थानी तयार होणार आहे. या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे. येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो. वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत. नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते. नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते. वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 years after gudhi padwa 2024 blessed by lord shani maharaj lucky zodiac signs who will get extreme rich money new job siddhi yog svs