Saturn-Venus Conjunction: 2024 मध्ये तब्बल ३० वर्षांनी दोन मित्र ग्रह एकत्र येणार असल्याचे समजतेय. कलियुगातील न्यायदेवता व वैभव सुखाचे कारक शुक्र देव नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एकत्र येणार आहेत. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शनी व शुक्राची ही युती तब्बल ३० वर्षांनी होणार आहे. काही राशींसाठी हा कालावधी अत्यंत भाग्यशाली ठरणार असल्याची चिन्हे आहेत. शनी व शुक्र हे एकमेकांचे मित्र ग्रह मानले जातात त्यामुळे त्यांच्या एकत्रित येण्याने शुभ प्रभाव द्विगुणित होऊन प्रभावित राशींच्या कुंडलीत दिसून येऊ शकतो. ज्योतिषांच्या माहितीनुसार शुक्र २०२४ मध्ये कुंभ राशीत भ्रमण करणार आहे तर शनीदेव अगोदरच कुंभ राशीत विराजमान आहेत. २०२५ पर्यंत शनीदेव कुंभेतच स्थित असणार असल्याने या कालावधीत अनेक राजयोग सुद्धा निर्माण होणार आहेत. या शनी- शुक्र युतीचा लाभ नेमक्या कोणत्या राशींना होऊ शकतो हे पाहूया..
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ मध्ये कुंभ राशीत शनी- शुक्राची युती होताच मेष राशीचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. या काळात आपल्याला सुरु केलेल्या प्रत्येक कामात शुभ परिणाम मिळू शकतात. शुक्राच्या कृपेने आपल्याला लक्ष्मीची साथ मिळू शकते. धनार्जनासाठी मुख्य माध्यम मात्र सरस्वतीची कृपा असू शकते. तुमच्या वाणीच्या माध्यमातून तुम्ही अनेकांवर प्रभाव पाडू शकता व यातून तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात वाढ झाल्याने समाजातील स्थान भक्कम होऊन तुमचा मान- सन्मान वाढीस लागू शकतो.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
वृषभ राशीच्या कुंडलीत दहाव्या भावात शनी व शुक्र एकत्र येणार आहे. या युतीच्या प्रभावाने वृषभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पाठबळ लाभेल तसेच वरिष्ठांच्या कौतुकाने भारावून जाण्याचा योग येईल. एखादा जुना जमिनीचा व्यवहार मार्गी लागू शकतो. कोर्टाच्या खटल्यात तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. कौटुंबिक एकोपा वाढवणारा एखादा प्रसंग घडू शकतो. लग्न किंवा समारंभाच्या निमित्ताने प्रिय नातेवाईकांशी भेट होऊ शकते. या काळात तुमच्या पूर्व श्रमाचा पुरेपूर फायदा होऊ शकतो.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
सरत्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये मिथुन राशीच्या शनीच्या साडेसातीमधून सुटका झाली होती. आता येत्या नववर्षात शनीदेव शुक्राच्या प्रभावासह मिथुन राशीच्या कुंडलीत नवव्या स्थानी स्थिर होणार आहेत. यामुळे येत्या वर्षात आपल्याला नशिबाची तगडी साथ लाभू शकते. तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास यातून अधिक नफा वाट्याला येऊ शकते . नोकरीमध्ये तुम्हाला हवी असणारी संधी गवसण्याची पूर्ण चिन्हे आहेत. मिथुन राशीच्या लोकांना अनपेक्षित धनलाभ होऊ शकते. अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात.
हे ही वाचा<< २०२४ मध्ये शनी महाराज तीन वेळा बदलणार चाल; ‘या’ राशींच्या कुंडलीत मोठ्या बदलांचे संकेत, धनलक्ष्मी देईल लाभ
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या मंडळींना येत्या काळात स्थैर्य अनुभवता येणार आहे. २०२४ मध्ये सिंह रास यशाच्या शिखरावर पोहोचू शकते पण सर्वात मोठा फायदा तुमच्या मानसिक आरोग्यला होऊ शकतो. तुम्ही यश व प्रगतीसह शांतता व समाधान अनुभवू शकणार आहात, जीवनात पुढे जाण्याचा वेग थोडा संथ होऊ शकतो मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या वेगळ्या अनुषंगाने अनुभूती घेता येऊ शकते. तुमचे समाधानच तुमचा चांगले व योग्य निर्णय घेण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. काही प्रमाणात बदलाचे संकेत आहेत. स्थानबदलामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)